दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण; श्रीनिवास रेड्डी याचा असा झाला नागपूर ते धारणी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 02:15 PM2021-04-29T14:15:16+5:302021-04-29T14:17:09+5:30

Amravati news हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात सहा आरोपी म्हणून अटक करण्यात आलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या एपीसीसीएफ श्रीनिवास रेड्डी याला बुधवारी सायंकाळी ७:३० वाजता अमरावती येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले व गुरुवारी पहाटे ४:३० वाजता धारणी येथे पोहोचून त्याला हवालात मध्ये टाकले.

Deepali Chavan suicide case; Srinivasa Reddy's arrest journey from Nagpur to Dharani | दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण; श्रीनिवास रेड्डी याचा असा झाला नागपूर ते धारणी प्रवास

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण; श्रीनिवास रेड्डी याचा असा झाला नागपूर ते धारणी प्रवास

Next
ठळक मुद्दे पोलिसांच्या नजर कैदेत होते पहाटे ५ वाजता पोलीस हवालातमध्ये टाकून दिले अंथरूण-पांघरूण

नरेंद्र जावरे

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात सहा आरोपी म्हणून अटक करण्यात आलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या एपीसीसीएफ श्रीनिवास रेड्डी याला बुधवारी सायंकाळी ७:३० वाजता अमरावती येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले व गुरुवारी पहाटे ४:३० वाजता धारणी येथे पोहोचून त्याला हवालात मध्ये टाकले त्यानंतर त्याला तेथेच अंथरूण-पांघरूण देण्यात आले तर विनोद शिवकुमार यांच्या हटके पासूनच नागपूर येथे पोलिसांच्या नजरकैदेत श्रीनिवास रेड्डी असल्याची माहिती आहे
 हरिसाल चव्हाण परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी 25 मार्च रोजी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली या गंभीर प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती या प्रकरणात गुगामल वन्यजीव विभागाचा निलंबित आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला अटक झाली त्यानंतर त्याच्या कृत्यावर वेळीच आळा न घातल्यास मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एपीसीसीएफ श्रीनिवास रेड्डी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी दीपाली चव्हाण यांचे पती राजेश मोहिते यांनी धारणी पोलीस स्टेशनला २६ मार्च रोजी फिर्याद दिली होती त्यामध्ये श्रीनिवास रेड्डी सुद्धा दीपावलीच्या मृत्यूस जबाबदार असल्याने यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती धारणी पोलिसांनी संबंधित तक्रारीची नोंद घेऊन प्रकरण चौकशीत ठेवले होते त्यानंतर शासनाने विविध समित्या गठीत केल्या तर याच्या चौकशीसाठी आयपीएस अधिकारी प्रज्ञा सरवदे यांची नियुक्ती केली होती त्यांनी दोन दिवस येऊन संपूर्ण प्रकरणात अधिकारी कर्मचाऱ्यांचे बयान नोंदविले त्यानंतर अचानक घडामोडी घडल्या व रेड्डीला तडकाफडकी अटक करण्यात आली

 नजर कैदेत होते रेड्डी, पूर्वीच घेतली परवानगी
दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणाचा संपूर्ण महाराष्ट्रभरातून विविध संघटना व माध्यमांनी सह समाजबांधवांनी श्रीनिवास रेड्डी यांच्या अटकेची मागणी लावून धरली होती रेड्डीने अटकपूर्व अंतरिम जामीन साठी अचलपूर न्यायालयात अर्ज दाखल केला होता न्यायालयाने तो फेटाळून गंभीर दखल घेतली होती रेड्डी पळून गेला अटक करायला अडचणी येतील हे पाहता वरिष्ठ अधिकारी नसल्याने मंत्रालयातील त्याच्या अटकेची परवानगी घेण्यात आली होती तर त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर असल्याची माहिती सूत्रांनी दिली

अटकेचा नागपूर ते धारणी प्रवास, गिट्टीखदान पोलीस स्टेशनला नोंद 
अमरावती स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी यांच्या नेतृत्वात रवी बावणे चेतन दुबे पंकज व अधिक कर्मचाऱ्यांना घेऊन बुधवारी  २:३० वाजता नागपूर साठी रवाना झाले, सायंकाळी ७:३० वाजता लोकेशन घेऊन हे पथक नागपूर येथील वनविभागाच्या शासकीय वसाहत सेमिनार विल्स प्लॉट नंबर ए १ /६०८ तेथे पोहोचले तेथे दोन मुलं व पत्नी यांच्यासह श्रीनिवास रेड्डी घरात हजर होते मुलगा निहाल याला चौकशीसाठी नेत असल्याची माहिती देऊन पोलिसांचे हे पथक ८:३०  वाजता अमरावती साठी निघाले श्रीनिवास रेड्डी यांना चौकशीसाठी नेत असल्याची नोंद नागपूर येथील गिट्टीखदान पोलिस स्टेशनला करण्यात आली त्यानंतर रात्री १२:३० वाजता अमरावती पोहोचले तेथे एसडीपीओ ऑफिसला काही वेळ थांबून थेट हे पथक धारणी पहाटे ४:३० ला पोहोचले 

वैद्यकीय तपासणी करून टाकले हवालात मध्ये
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात सहआरोपी असलेले मार्तंला श्रीनिवास रेड्डी एम रामसुप्पा रेड्डी यांची धारणी येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यानंतर तपास अधिकारी तथा एचडीपी व पुनम पाटील यांनी पोलीस स्टेशनच्या स्टेशन डायरीत नोंद करून हवालात मध्ये  डांबले ठाण्याचे ठाणेदार विकास कुलकर्णी यांनी सदर आरोपीला ताब्यात घेऊन  अंथरूण-पांघरूण  देण्यात आले व नियमानुसार

रेड्डींनी वकीलाला पहाटे केला फोन 
धारणी येथे पोहोचल्यानंतर श्रीनिवास रेड्डी यांना सर्वोच्च न्यायालयाच्या अटी शर्ती चे पालन करत अटक करून त्याची नोंद घेण्यात आली व पोलिस कर्मचाऱ्यांचा खडा पहारा लावण्यात आला दरम्यान श्रीनिवास रेड्डी यांनी आपल्या वकीलास फोन लावण्याची विनंती पोलिसांना केल्यावर ती मुभा देण्यात आली मात्र पहाटे त्यांच्या वकिलांनी फोन उचलला नाही

 

 

 

 

 

Web Title: Deepali Chavan suicide case; Srinivasa Reddy's arrest journey from Nagpur to Dharani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.