शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

Deepali Chavan Suicide Case: अटक टाळण्यासाठी रेड्डी न्यायालयात, पण दिलासा नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 7:58 AM

Deepali Chavan Suicide Case: मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अप्पर मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी याने बुधवारी अचलपूर येथील जलदगती न्यायालयात दाखल केलेल्या अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जावर तपास अधिकाऱ्यांची बाजू जाणून घेतली जाईल.

परतवाडा (अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अप्पर मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी याने बुधवारी अचलपूर येथील जलदगती न्यायालयात दाखल केलेल्या अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जावर तपास अधिकाऱ्यांची बाजू जाणून घेतली जाईल. त्यानंतरच निर्णय होईल, असे न्यायमूर्ती एस.के. मुंगीनवार यांच्या न्यायालयाने स्पष्ट केल्याने रेड्डीला तूर्त दिलासा मिळाला नाही. अटकपूर्व अर्जावर ३ एप्रिल रोजी यासंबंधी सरकारी अभियोक्ता किंवा तपास अधिकारी यांना ३ एप्रिल रोजी म्हणणे मांडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात गुगामल वन्यजीव विभागाचा निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला धारणी न्यायालयाने मंगळवारी न्यायालयीन कोठडीत पाठविले. त्यानंतर त्याला पाठीशी घालणाऱ्या अमरावती वनवृत्ताच्या तत्कालीन निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी याच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी होत असताना  बुधवारी त्याच्या वकिलांतर्फे अचलपूर येथील जलदगती न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज करण्यात आला होता. मात्र, जलदगती न्यायालयाने रेड्डी याच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर ते म्हणणे ग्राह्य न धरता केलेल्या अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जावर सरकारी बाजू ऐकल्यानंतरच निर्णय होईल. त्यानुसार सरकारी पक्षाला तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे दाखल करण्याबाबत समन्स बजावले आहे. रेड्डींच्या निलंबनाचे आदेश धडकलेनागपूर : दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी अखेर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास रेड्डी यांच्या निलंबनाचे आदेश अखेर २४ तासांनंतर निघाले आहेत. मंगळवारी दुपारपासून त्यांच्या निलंबनाचे आदेश तयार असले तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दडपणामुळे त्यात विलंब होत होता. अखेर वन मंत्रालयाने खंबीर भूमिका घेत बुधवारी उशिरा हे आदेश निर्गमित केले.मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय) अरविंद आपटे यांच्या स्वाक्षरीने हे आदेश निर्गमित झाले असून, या निलंबन काळात रेड्डी यांचे मुख्यालय प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) कार्यालय हे असेल. दरम्यान, दीपाली आत्महत्याप्रकरणी राज्य महिला आयोगाने अमरावतीचे जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. व अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांना नोटीस बजावली आहे.

टॅग्स :Deepali chavanदीपाली चव्हाणAmravatiअमरावतीforest departmentवनविभाग