शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : रेड्डीच्या अंतरिम अटकपूर्व जामिनावर आज सरकार पक्ष बाजू मांडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 7:40 AM

गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांच्या वकिलाने अचलपूर येथील जलदगती न्यायालयात अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावर शनिवारी सरकारी पक्षातर्फे तपास अधिकाऱ्यांकडून ‘से’ दाखल होण्याची शक्यता आहे

परतवाडा (जि. अमरावती) : गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांच्या वकिलाने अचलपूर येथील जलदगती न्यायालयात अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावर शनिवारी सरकारी पक्षातर्फे तपास अधिकाऱ्यांकडून ‘से’ दाखल होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी वनकर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविले आहे. दीपाली आत्महत्या प्रकरणात  उपवनसंरक्षक विनोद शिवकुमारला अटक करण्यात आली आहे. धारणी न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. शिवकुमार याच्या त्रासासंदर्भात दीपालीने रेड्डी यांना पत्राद्वारे माहिती दिली होती. मात्र, त्यावर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आत्महत्या प्रकरणात रेड्डींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी सर्व स्तरावरून होत आहे. त्यामुळे गुन्हा दाखल होण्याच्या व अटकेच्या भीतीने रेड्डी घाबरले आहेत. त्यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जावर शनिवार, ३ एप्रिल रोजी सरकारी अभियोक्ता किंवा तपास अधिकाऱ्यांना ‘से’ दाखल करण्याचे सुचविले आहे. 

पत्र जप्त दीपाली यांच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी त्यांच्या सहकारी वनमजूर वनपाल व कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविले आहे. तसेच झालेला पत्रव्यवहार आणि इतर कागदपत्रे ताब्यात घेतली असून त्यात अनेक बाबींचा खुलासा होण्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांनी गनिमी काव्याने नेले शिवकुमारला  शिवकुमार याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर लोकांपासून वाचवत अमरावती कारागृहात नेण्यासाठी पोलिसांनी गनिमी काव्याचा अवलंब करीत त्याला पाच तालुके फिरवले. शुक्रवारी ही माहिती उघड झाली. या आत्महत्या प्रकरणात संपूर्ण राज्यभर विविध संघटना व नागरिकांच्या संतापाच्या उद्रेकाची शक्यता पाहता, आरोपीच्या सुरक्षिततेचे दडपण पोलिसांवर आले होते.  शिवकुमारला धारणी, हरिसाल सेमाडोह, परतवाडा या मार्गाने अमरावती कारागृहात नेल्यास दगडफेक तसेच जनआक्रोशाचा सामना करावा लागेल, अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. यामुळे पोलिसांनी प्रचंड बंदोबस्तात धारणी, ढाकना, खोंगडा (ता. चिखलदरा), परसापूर, पथ्रोट, (ता. अचलपूर), अंजनगाव सुर्जी, दर्यापूरमार्गे अमरावती असा पाच तालुक्यांतून प्रवास केला. दीपाली आत्महत्येची चौकशी महिला आयपीएसमार्फत करा - फडणवीसमुंबई : मेळघाटमधील वनअधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येची चौकशी ज्येष्ठ महिला आयपीएस अधिकाऱ्यांमार्फत करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली. जलदगती न्यायालयात खटला चालवावा आणि विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशाही मागण्या त्यांनी केल्या.फडणवीस यांनी म्हटले की, वयाच्या तिशीत असलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते. त्याबाबत आरोप असलेल्यांची सुरुवातीला केवळ बदली होते. आंदोलने झाल्यानंतरच अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांचे निलंबन होते. खरे तर फौजदारी कारवाई सुरू असताना खातेनिहाय चौकशी आवश्यक असते; पण तसे आदेश न काढता अंतर्गत चौकशी समिती नेमली गेली, असेही फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Deepali chavanदीपाली चव्हाणAmravatiअमरावती