शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Deepali Chavan: शेर से डर नहीं लगता साब, ‘फॉरेस्ट’वालों से लगता है...दीपाली चव्हाणच्या आत्महत्येनंतरचे खळबळजनक वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 05:45 IST

Deepali Chavan suicide case: ‘लेडी सिंघम’ दीपाली चव्हाण यांच्या अवेळी जाण्याने उभा महाराष्ट्र हळहळला. दीपालीने तीन पानांची खळबळजनक सुसाईड नोट लिहून २५ मार्च रोजी स्वतःवर गोळी झाडली. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला. निलंबित उपवनसंरक्षक व मुख्य आरोपी विनोद शिवकुमार आणि त्याचा वरिष्ठ अधिकारी श्रीनिवास रेड्डी यांच्या अत्याचाराची कहाणी स्तब्ध करणारी आहे. 

नरेंद्र जावरेलोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : मेळघाटातील आदिवासींमध्ये एक म्हण प्रचलित आहे. “शेर से डर नहीं लगता साब, ‘फॉरेस्ट’वालों से लगता है.” वनविभागातील कारभाराचा अंदाज घेतला, तर त्यात तथ्य जाणवले. एकेकाळी मेळघाटातील अख्ख्या गावांवर वनरक्षक असलेल्या कर्मचाऱ्यांचा दरारा असायचा. पण, आता वन कर्मचारी ते वनपरिक्षेत्र अधिकारी डोक्यावरील आयएफएस वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणारा मानसिक त्रास, अत्याचार मुकाट सहन करताहेत. वन विभाग आणि व्याघ्र प्रकल्पातील अनेक कर्मचारी नोकरशाहीच्या प्रचंड दडपणाखाली असल्याचे वास्तव आहे.राज्यातील एकूण ६ व्याघ्र प्रकल्पांपैकी पाच विदर्भात आहेत. त्यापैकी सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे मेळघाट.  जंगलात स्थानिकांकडून सतत लावण्यात येणाऱ्या आगी, वन्य प्राण्यांसाठी पाणवठा व इतर व्यवस्था करणे, शिकारी रोखणे, सागवान, गोंद, बारशिंगाची तस्करी, पुनर्वसन, शिकारी व इतर आरोपींचा छडा लावून न्यायालयीन कामे सांभाळणे अशा अनेक कामांत क्षेत्रीय कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांचा प्रचंड दबाव असल्याचे दिसून येते. यातूनच वन कर्मचारी आणि आदिवासींमध्ये सतत संघर्ष उडतो. कनिष्ठ कर्मचारी परिवारासाठी जीव मुठीत घेऊन प्रत्येक रात्र काढतात. हे सर्व करीत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सततचा दबाव, अपमानास्पद वागणूक हा प्रकार नेहमीचा झाला आहे. तिन्ही महिला कर्मचाऱ्यांना रात्रीबेरात्री दिली जाणारी वागणूकही शहारे आणणारी आहे.आयएफएसचे लांगुलचालनमेळघाट व्याघ्र प्रकल्पात चार वन्यजीव विभाग आहेत. शासनाने २७ एपीसीसीएफ पदे निर्माण केली. पण, पद रिक्त नसेल तर खूप दिवस वाट पाहावी लागते. 

समस्यांचा पाढा...१. ९० टक्के महिला वन कर्मचाऱ्यांसाठी अगदी बेसिक सुविधाही नाहीत.२. ७२ तास महिला वन कर्मचारी पुरुष सहकाऱ्यांसोबत काम करतात.३. सामूहिक जंगल गस्ती, रात्री-अपरात्री कॅम्पवर ड्युटी.४. दीपाली चव्हाण कार्यालय प्रमुख असतानाही महिलांसाठी शौचालय  नव्हते.५. क्षेत्रीय कर्मचारी राहात असलेल्या निवासस्थानाची अवस्था बकाल.६. शहराच्या ठिकाणी कुटुंबांना ठेवून कर्मचाऱ्यांचे वास्तव्य.७. मोबाईल रेंज नसल्याने ‘वायरलेस’ हेच संपर्काचे एकमेव साधन.८. अनेक ठिकाणी दवाखाने नसल्याने आजारपणातही रजा नाही.मेळघाटात.... २२३२ एकूण अधिकारी-कर्मचारी १ महिला एक उपवनसंरक्षक३ वन परिक्षेत्र अधिकारी३७ वनपाल२०० वनरक्षक २४० एकूण महिला 

‘उलटा-पिरॅमिड’!nवरिष्ठ अधिकाऱ्यांचा भरणा आणि कनिष्ठ यंत्रणेची संख्या तोकडी या प्रशासकीय स्थितीला ‘उलटा-पिरॅमिड’ असे संबोधले जाते. ५ प्रधान, २७ अप्पर प्रधान वनाधिकारी महाराष्ट्राचा कारभार पाहतात. nदहा अधिकारी एका कनिष्ठ कर्मचाऱ्याला दहा वेगवेगळे आदेश देतात. वन विभागातल्या रेंजर मंडळींची अवस्था त्यामुळे कथन करण्यासारखी नाही. 

नियमबाह्य कामेही...nकोणतेही काम व विशेष अधिकार नसलेले सुपर क्लासवन अधिकारी वेगवेगळ्या बैठका, व्हिडिओ कॉन्फरन्स घेतात. nनियमबाह्य कामे तोंडी सांगितली जातात. न केल्यास सीआर खराब करण्याची धमकी दिली जाते. केले तर चौकशी लागण्याची भीती. अशा अडकित्त्यात सापडेल्या मराठी अधिकाऱ्याने आत्महत्या न केली तरच नवल!

टॅग्स :Deepali chavanदीपाली चव्हाणforest departmentवनविभाग