शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

परीक्षा विकेंद्रीकरण ऐतिहासिक पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 10:34 PM

हिवाळी-२०१७ च्या परीक्षा महाविद्यालयीन स्तरावर घेण्याचा आणि परीक्षा विकेंद्रीकरणाचा विद्यापीठ प्राधिकारिणींचा निर्णय ऐतिहासिक असून नवी पद्धत संलग्नित महाविद्यालयांमध्ये योग्य पद्धतीने गुणवत्ता राखून राबविल्या जाईल, .....

ठळक मुद्देप्र-कुलगुरू : विद्यापीठात प्राचार्यांची कार्यशाळा

आॅनलाईन लोकमतअमरावती: हिवाळी-२०१७ च्या परीक्षा महाविद्यालयीन स्तरावर घेण्याचा आणि परीक्षा विकेंद्रीकरणाचा विद्यापीठ प्राधिकारिणींचा निर्णय ऐतिहासिक असून नवी पद्धत संलग्नित महाविद्यालयांमध्ये योग्य पद्धतीने गुणवत्ता राखून राबविल्या जाईल, असे प्रतिपादन प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर यांनी केले.परीक्षा विकेंद्रीकरणाबाबत प्राचार्य आणि प्रतिनिधींच्या एकदिवसीय कार्यशाळेला प्र-कुलगुरू यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जे.डी. वडते, जनसंपर्क अधिकारी विलास नांदूरकर, उपकुलसचिव आर.व्ही. दशमुखे व वि.रा. मालवीय, सहायक कुलसचिव मोनाली वानखडे, अ.रा. काळबांडे, राहुल नरवाडे व मीनल मालधुरे उपस्थित होत्या.परीक्षा संचालनासाठी ३० टक्के खर्च महाविद्यालयांना दिला जाईल. खर्चाची रक्कम वाढविण्याबाबत कार्यशाळेत मागणी झाली असता, परीक्षा संचालनासाठी जो खर्च होईल, तो विद्यापीठ नियमानुसार महाविद्यालयांना देण्याबाबत त्यांनी आश्वस्त केले. परीक्षा विकेंद्रीकरणाची पद्धत यशस्वी करण्यासाठी सर्वच महाविद्यालये सकारात्मक दृष्टिकोनातून प्रयत्नरत असल्याबद्दल त्यांनी सर्व प्राचार्यांप्रती आभार व्यक्त केले. याप्रसंगी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी अभ्यासपूर्ण उत्तरे दिलीत. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जे.डी. वडते यांनी प्रास्ताविक भाषणातून परीक्षा विकेंद्रीकरणावरील कार्यशाळा आयोजनामागील भूमिका विशद केली आणि पी.पी.टी. प्रेझेन्टेशनद्वारा परीक्षा प्रणालीची माहिती उपस्थित सर्वांना दिली.