शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यातल्या चिखली आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थिनीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 13:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चिखलदरा तालुक्यातील चिखली येथील शासकीय आश्रमशाळेतील संवर्गाच्या विद्यार्थिनीचा शनिवारी रात्री धारणी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आदिवासींमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात मुख्याध्यापकासह संबंधित शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहेप्रीती साबुलाल कासदेकर (१०, रा. कारा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. चिखली येथील शासकीय ...

ठळक मुद्देआजारी असताना पायी चालत गेली गावालाआदिवासींमध्ये संताप, गुन्हा दाखल करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चिखलदरा तालुक्यातील चिखली येथील शासकीय आश्रमशाळेतील संवर्गाच्या विद्यार्थिनीचा शनिवारी रात्री धारणी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आदिवासींमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात मुख्याध्यापकासह संबंधित शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहेप्रीती साबुलाल कासदेकर (१०, रा. कारा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. चिखली येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत इयत्ता सहावीत शिकणारी प्रीती मागील सहा दिवसांपासून आजारी होती. शनिवारी सायंकाळी प्रकृती बिघडल्यानंतर ती दोन किलोमीटर अंतरावरील आपल्या गावी पायी गेली. प्रकृती खालावल्याने पालकांनी तिला हरिसाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु शनिवारी रात्री १२ वाजता तिचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी १२ वाजता तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्याध्यापक, अधीक्षक किंवा वर्गशिक्षकांपैकी तिच्याकडे कोणीच लक्ष दिले नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

संबंधितांवर गुन्हे दाखल कराप्रीती ही आजारी असतानाही सर्वांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले. त्यातच तिची प्रकृती जास्त खालावली आणि मृत्यू झाला असल्याचा आरोप करीत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पालकांसह आदिवासी गावकऱ्यांनी केली आहे. युवक काँग्रेसचे पंकज मोरे यांच्या नेतृत्वात सोमवारी प्रकल्प अधिकाऱ्यांसह संबंधितांना निवेदन दिले जाणार आहे.

शवविच्छेदन झालेच नाहीउपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना प्रीती मृतावस्थेतच तेथे दाखल झाल्याचे लेखी बयान वडील साबुलाल कासदेकर यांनी दिले. याशिवाय शवविच्छेदन न करण्याचेसुद्धा लिहून दिले. यामुळे शवविच्छेदन न करताच मध्यरात्री २ वाजता प्रीतीचा मृतदेह परिजनांच्या ताब्यात मृतदेह दिला, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक हेमंत भिलावेकर यांनी दिली. त्यामुळे प्रीतीचा मृत्यू नेमका कशाने झाला, याचा खुलासा झालेला नाही. हरिसाल येथील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, प्रीतीला उपजिल्हा रुग्णालयात जिवंतच दाखल करण्यात आले होते. आता मृत्यूचे कारण शोधण्यासाठी न्यायालयाच्या आदेशावरूनच पुन्हा मृतदेह काढून शवविच्छेदन करावे लागणार, हे विशेष.चिखली शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूची घटना दु:खद आहे. यासंदर्भात आपण संपूर्ण चौकशीचे आदेश दिले आहे. दोषींवर कारवाई करण्यात येईल.- राहुल कर्डिले, प्रकल्प अधिकारी, धारणी

टॅग्स :Deathमृत्यूStudentविद्यार्थी