शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चारचाकीचे चाक पोटावरून गेल्याने बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:44 IST

सेंट्रिंगच्या लाकडांनी भरलेले चारचाकी वाहन मागे घेताना चाक पोटावरून गेल्याने सात वर्षीय बालकांचा करुण अंत झाला. दयान मुल्ला तौफी मुल्ला (७, रा. सुफीनगर) असे मृताचे नाव आहे. ही हृदयदायक घटना रविवारी सकाळी १०.३० च्या सुमारास वलगाव स्थित सुफीनगरात घडली.

ठळक मुद्देवाहनचालकाला अटक : सुफीनगरातील हृदयद्रावक घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सेंट्रिंगच्या लाकडांनी भरलेले चारचाकी वाहन मागे घेताना चाक पोटावरून गेल्याने सात वर्षीय बालकांचा करुण अंत झाला. दयान मुल्ला तौफी मुल्ला (७, रा. सुफीनगर) असे मृताचे नाव आहे. ही हृदयदायक घटना रविवारी सकाळी १०.३० च्या सुमारास वलगाव स्थित सुफीनगरात घडली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून, वलगावात शोककळा पसरली आहे.सुफीनगरातील रहिवासी दयान मुल्ला तौफी मुल्ला हा सात वर्षीय बालक वलगावातील एका शाळेत दुसऱ्या वर्गात शिकत होता. रविवारी सुट्टी असल्यामुळे तो संवगड्यांसोबत घरासमोरील रस्त्यावर खेळत होता. यावेळी परिसरातील बांधकाम स्थळावरून चालक आपल्याकडील पीकअप (क्रमांक एमएच ०४ ईबी-१९९४) मागे (रिवर्स) नेत होता. यादरम्यान रस्त्यावर खेळणाºया दयानकडे चालकाचे दुर्लक्ष झाले व धडकेने रस्त्यावरून कोसळलेल्या दयानच्या पोटावरून वाहनाचे मागील चाक गेले. अपघातानंतर मात्र दयान स्वत: उठून आपल्या घराच्या दारापर्यंत गेला आणि ‘अम्मी’ला आवाज देत खाली कोसळला. त्याच्या आईने बाहेर धाव घेतली. अपघात घडल्याचे निदर्शनास येताच कुटुंबीयांनी दयानला तात्काळ वलगावातील रुग्णालयात नेले. तेथून त्याला अमरावतीच्या खासगी रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर इर्विन रुग्णालयात आणले गेले. तेथे डॉक्टरांनी दयानला मृत घोषित केले. या हृदयदायक घटनेमुळे वलगावात खळबळ उडाली होती. अपघातानंतर वाहनचालकाने थेट वलगाव पोलीस ठाणे गाठून स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले.पोलिसांनी वाहनचालक मोहम्मद इलियास शेख मजीद (५२, रा. सौदागरपुरा) याला अटक करून वाहन जप्त केले. दयानचे वडील बांधकामावर मजूर असून, आई, वडील, मोठा भाऊ व एक बहीण असे त्याचे कुटुंब आहे. दयानच्या मृतदेहाचे रविवारी दुपारी शवविच्छेदन करण्यात आले. वलगाव पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, त्याला अटक केली आहे.

टॅग्स :Accidentअपघात