टाकरखेडासंभू (वार्ताहर) : क्षुल्लक वादातून झालेल्या भांडणामुळे पाच जणांनी दोन भावंडांवर प्राणघातक हल्ला केला. ही घटना शिराळा येथे शुक्रवारी घडली. त्यापैकी एकाला उपचारासाठी नागपूरला हलविले.शिराळा येथील रामकृष्ण चंपक उके यांनी शेतातून आणलेला चारा किसन कावरे यांच्या घरासमोर ठेवल्याने दोघांत वाद झाला. विवेक व पवन कावरे यांनी काठीने आशिष व अमोल या दोन भावंडांवर प्राणघातक हल्ला केला. यात ते जखमी झाले. वलगाव पोलिसांनी किसन कावरे, पवन कावरे, नीलेश कावरे, गजानन कावरे, मंगेश कावरे यांच्याविरुध्द गुन्हा नोंदविला. किसन, पवन, नीलेश यांना अटक केली. (वार्ताहर)
शिराळ्यात भावंडांवर प्राणघातक हल्ला
By admin | Updated: February 7, 2015 00:03 IST