शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! मोर्शीत दिवाणच्या बाॅक्समध्ये आढळला आई-मुलाचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 11:21 IST

घातपाताचा संशय

मोर्शी (अमरावती) : शिवाजीनगर येथील घरात शुक्रवारी दुपारी आई आणि मुलाचा मृतदेह पेटी दिवाणच्या बॉक्समध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

मोर्शीतील शिवाजीनगर येथील दिवंगत गणेश कापसे यांची पत्नी नीलिमा गणेश कापसे (४५) व मुलगा आयुष गणेश कापसे (२२) हे घरात होते. सतत पाच ते सहा दिवसांपासून मोबाइलवर संपर्काचा प्रयत्न करूनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने नीलिमाचे वडील शुक्रवारी कोंढाळीहून मोर्शीला आले. घराचे दार उघडत नसल्याचे पाहून त्यांनी पोलिस ठाणे गाठले. त्यांच्या माहितीवरून मोर्शीचे ठाणेदार श्रीराम लांबाडे व त्यांच्या चमूने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी कापसे यांच्या घराजवळील परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली होती.

पोलिसांनी घराचे दार उघडून बघितले असता त्यांना पेटी दिवाणमध्ये नीलिमा व आयुषचे कुजलेले मृतदेह आढळून आले. यावेळी कॉलनी परिसरातील नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. नीलिमा व आयुष यांच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठविले आहेत. नीलिमा या एमआरजीएसमध्ये काम करीत होत्या तर आयुष हा शिक्षण घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती