शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

अंजनगाव-पांढुर्णा बस उलटली एक ठार, ५३ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 1:34 AM

अंजनगावहून पांढुर्ण्याला जाणारी खासगी बस मोर्शी ते चांदूरबाजार रोडवर मधापुरीजवळ उलटल्याने एक महिला प्रवासी ठार, तर ५३ जण जखमी झाले. १५ जून रोजी सकाळी १० वाजता हा अपघात घडला.

ठळक मुद्देवळण रस्त्यावर अपघात । मोर्शी ते चांदूरबाजार मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : अंजनगावहून पांढुर्ण्याला जाणारी खासगी बस मोर्शी ते चांदूरबाजार रोडवर मधापुरीजवळ उलटल्याने एक महिला प्रवासी ठार, तर ५३ जण जखमी झाले. १५ जून रोजी सकाळी १० वाजता हा अपघात घडला.करुणा सोपान मालधुरे (४५, रा. बहिरम करजगाव) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. सदर बस अंजनगाव सुर्जीचे रामूशेठ अग्रवाल यांच्या मालकीची असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. यामध्ये १०० हून अधिक प्रवासी खच्चून भरले होते. मधापुरीजवळील वळण कापतेवेळी ब्रेक दाबल्यामुळे भरधाव बसने दोन पलट्या घेतल्या आणि ती उलटली. जखमी प्रवाशांना बसमधून नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. या प्रवाशांवर पाच किलोमीटरवरील मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. काही गंभीर जखमी प्रवाशांंना अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.जखमींमध्ये नूरजाबी हदबशहा (६०, रा. घाटलाडकी), रफिजा परवीन (५०, रा. पांढुर्णा), पूजा विजय ढोले (४५, रा. शिरजगाव कसबा), राजेंद्र मारोती कवाडे (६०, रा. शेंदूरजनाघाट), पुष्पा मारोतराव लोखंडे (४५, रा. शेंदूरजनाघाट), चंद्रशेखर उमेश गोरडे (३८, रा. सर्फापूर), संजय वामनराव गुल्हाने (४५, रा. पुसला), भीमराव नारायण चरपे (६५, रा. शिरजगाव कसबा), पुरुषोत्तम नारायण दाभाडे (४७, रा. शिरजगाव कसबा), गौरी पुरुषोत्तम दाभाडे (१३, रा. शिरजगाव कसबा), जयश्री मंगेश वाढीवकर (४०, रा. शिरजगाव कसबा), रमेश गणपत आमझरे (रा. देऊरवाडा), शांता चरपे (६०, रा. करजगाव), सुधाकर मारोतराव भोसरे (रा. घाटलाडकी), सुभाष शिरभाते (रा. ब्राम्हणवाडा थडी), प्रदीप वानखडे (रा. करजगाव) अशी जखमींची नावे आहेत.ममता दाभाडे (रा. शिरजगाव कसबा), राजेंद्र लोखंडे (रा. शेंदूरजनाघाट), सुभाष शिरभाते (रा. ब्राह्मणवाडा थडी), कमलाबाई देवकर (रा. शिरजगाव कसबा), पुष्पा ढोले (रा. शेंदूरजनाघाट), पुरुषोत्तम दाभाडी (रा. शिरजगाव कसबा), गौरी दाभाडे (रा. शिरजगाव कासबा), भीमराव चरपे (रा. करजगाव), शांता भीमराव चरपे (रा. करजगाव), इंदुबाई खासबागे (रा. वरूड), भूमिका संजय चौधरी (रा. अंबाडा), रफीसा परवीन मुस्ताक (रा. पांढुर्णा), अनिता राजेश देऊळकर (रा. शिरजगाव कसबा), दिलीप रामभाऊ फरकाडे (रा. करजगाव), प्रदीप वालखेडे (रा. करजगाव), शारदा काटोलकर (रा. शिरजगाव), विनोद यशवंतराव डेहनकर (रा. ब्राह्मणवाडा थडी), मध्य प्रदेशातील भोपाळ येथील राजेश रामदास ठाकरे, सुनीता रामदास ठाकरे, हर्षल राजेश ठाकरे, पूनम राजेश धोटे, कोमल धोटे, सविता राजेश धोटे यांच्यावर डॉ. दीपक ढोले यांच्या रुग्णालयात उपचार करण्यात आला.सुधाकर मारोतराव तसरे, प्रगती हरिभाऊ बोडाखे (रा. ब्राह्मणवाडा थडी), संध्या श्रीकृष्ण ढोणे, प्रमोद बनसोड, नूरजहानबी तोगर आझाद शाह, हिमानी मालधुरे (रा. करजगाव), गुंजन मालधुरे, कांता वसंत पाटील, सोनाली शिरीष बेलसरे (रा. शेंदूरजनाघाट) आदी प्रवाशांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.दरम्यान, किरकोळ जखमी झालेला चालक साजिद (रा. परतवाडा) याने बसमधून बाहेर पडताच घटनास्थळाहून पलायन केले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अपघाताचे वृत्त माहिती होताच आ. अनिल बोंडे यांनी आरोग्य यंत्रणेला आवश्यक मदत पुरविण्याची सूचना केली.

टॅग्स :Accidentअपघात