शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

धामणगाव तालुक्यात डेंग्यूचा डंख, आरोग्य यंत्रणेचा अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 21:09 IST

धामणगाव रेल्वे : एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींना डेंग्यूची लागण झाल्याचे पुढे आल्यानंतर धामणगाव तालुक्याचा आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. 

धामणगाव रेल्वे : एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींना डेंग्यूची लागण झाल्याचे पुढे आल्यानंतर धामणगाव तालुक्याचा आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. ग्रामपंचायतींच्या अनास्थेमुळे ३५ गावांमध्ये शेणखताचे ढिगारे उपसले गेले नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.तालुक्यातील तळेगाव दशासर येथील गत आठवड्यात अमोल कावळे यांच्या दोन मुलींना डेंग्यूची लागण झाली. यानंतर त्यांचे बंधू नीलेश कावळे यांच्या मुलाच्या रक्तनमुन्यात डेंग्यूचे विषाणू आढळले. यामुळे झाल्याचे दिसले़ त्यामुळे धामणगाव तालुक्यातील आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. ज्या कुटुंबातील व्यक्तींना अनेक दिवसांपासून ताप आहे, अशा रुग्णांची रक्ततपासणी युद्धस्तरावर सुरू आहे. आरोग्य विभाग कार्यमग्न असला तरी ग्रामपंचायतीचे सहकार्य मिळत नसल्याच्या वेदना या विभागातील कर्मचारी व्यक्त करतात. दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेणखत गावाबाहेर टाकण्याबाबत ग्रामपंचायत संबंधितांना नोटिसा देते. मात्र यंदा हे शेणखत गावालगतच्या खड्ड्यांमध्येच मुरले असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तळेगाव दशासरसारखी परिस्थिती इतर गावांमध्ये पसरण्यासाठी यामुळे अवधी लागणार नाही, अशी भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे़दूषित पाण्याकडे दुर्लक्षदूषित पाण्याचे नमुने येत असताना पंचायत समितीचे विस्तार अधिकारी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. विस्तार अधिकारी थेट नागपूरहून ये-जा करीत असल्याने दूषित पाण्याबाबत काळजी कोण घेणार, असा सवाल निर्माण झाला आहे. संबंधित कर्मचा-यांची खातेनिहाय चौकशी करून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.तळेगावात स्वच्छता अभियानतळेगाव दशासरमधील तीन चिमुकल्यांना डेंग्यूची लागण झाल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने गावात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. सरपंच व ग्रामसचिव जयंत खैर यांनी स्वच्छता मोहिमेला गती दिली आहे. दरम्यान ज्या भागात डेंग्यूचे रुग्ण आढळले, त्या भागातील आरोग्य व स्वच्छतेबाबत अद्ययावत माहिती जिप़ सदस्य अनिता मेश्राम दररोज घेत आहे़त. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अशोक लांडगे हे लक्ष ठेवून आहेत.धामणगाव तालुक्यातील प्रत्येक घराचे सर्वेक्षण करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले असून, ज्या व्यक्तीला अनेक दिवसांपासून ताप आहे, अशा व्यक्तींना योग्य उपचारासाठी हलविण्यात येत आहे.- विजय शेंडे,तालुका आरोग्य अधिकारी

टॅग्स :Amravatiअमरावती