उड्डाणपुलाच्या उतारावरच धोकादायक वळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 12:51 AM2019-09-03T00:51:27+5:302019-09-03T00:51:46+5:30

नरखेड रेल्वे क्रॉसिंग उडाणपूल जवळून चौपदरीकरणाच्या कामाला सुरूवात करून चार महिन्यांचा अवधी उलटला आहे. हे काम संथगतीने सुरू आहे. त्यात नियमांना डावलूनच काम सुरू असल्याने ते वाहतुकीकरिता धोक्याचे ठरत आहे. उड्डाणपुलावरून उतरले की तात्पुरत करण्यात आलेल्या वळण रस्त्याचे डायव्हर्शन हे फलक वाहन चालकांना दिसूनच पडत नाही. तसेच जेथून काम सुरू करण्यात आले त्याच्यासमोर सुस्पष्ट फलके नसल्यामुळे अनेक वाहने सरळ जात आहेत.

Dangerous turn right on the flight ramp | उड्डाणपुलाच्या उतारावरच धोकादायक वळण

उड्डाणपुलाच्या उतारावरच धोकादायक वळण

Next
ठळक मुद्देवाहने जातात सरळ : अस्पष्ट फलकांमुळे वाढले अपघात

बडनेरा : बडनेरा मार्गावर नरखेड रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूल संपताच चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्याठिकाणी धोकादायक वळण दिल्याने तसेच अस्पष्ट फलकांमुळे अनेक वाहने सरळ जात आहे. प्रशासनाचा अक्षम्य दुर्लक्षितपणाच कारणीभूत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शहरवासियांसह वाहन चालकांमध्ये आहे.
नरखेड रेल्वे क्रॉसिंग उडाणपूल जवळून चौपदरीकरणाच्या कामाला सुरूवात करून चार महिन्यांचा अवधी उलटला आहे. हे काम संथगतीने सुरू आहे. त्यात नियमांना डावलूनच काम सुरू असल्याने ते वाहतुकीकरिता धोक्याचे ठरत आहे. उड्डाणपुलावरून उतरले की तात्पुरत करण्यात आलेल्या वळण रस्त्याचे डायव्हर्शन हे फलक वाहन चालकांना दिसूनच पडत नाही. तसेच जेथून काम सुरू करण्यात आले त्याच्यासमोर सुस्पष्ट फलके नसल्यामुळे अनेक वाहने सरळ जात आहेत. त्यामुळे कित्येकदा दुचाकीस्वार सरळ चौपदरीकरणाच्या कामातील खड्ड्यात पडल्याच्या घटना घडल्या आहेत. एसटी महामंडळाची बसदेखील यात फसली होती. बसचालकाच्या समयसुचकतेमुळे मोठी दुर्घटना टळली. त्याचप्रमाणे वळण रस्ता क्रॉस करून एक शहरबसदेखील रस्ता सोडून खाली गेली. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षितपणामुळेच असे अपघात घडले आहेत. उड्डाणपुलाच्या उतारावर जेथे काम सुरू आहे त्याठिकाणी वाहन चालकांना लक्षात येईल, अशी फलके लावावित, वळण रस्तादेखील दृष्टीस पडेल, अशा पद्धतीने डायव्हर्शनचे फलक लावावे, अशी शहरवासीयांसह वाहनचालकांकडून केली जात आहे. याकडे लक्ष न दिल्यास मोठा अपघातदेखील घडू शकतो, हे नाकारता येणार नाही.

चौपदरीकरणाच्या कामाला केव्हा येणार गती?
नरखेड रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूल ते गांधी विद्यालयासमोरील रेल्वे उड्डाणपुलापर्यंतचे चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याच्या प्रतिक्रिया शहरवासियांमध्ये आहे. अवघ्या तीन किलोमीटर अंतराला एवढा वेळ का, या कामाला गती केव्हा येणार, असा सवालही उपस्थित होत आहे.

Web Title: Dangerous turn right on the flight ramp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.