शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

५६ हजार हेक्टरमधील पिके धोक्यात

By admin | Updated: August 21, 2014 23:33 IST

तालुक्यात २४ दिवसांपासून पाऊस नसल्याने नैसर्गिक परिस्थितीचा परिणाम खरिपाच्या सर्वच पिकांवर जाणवू लागला आहे. यामुळे तालुक्यातील ५६ हजार ३९३ हेक्टरवरील खरिपाची पिके मोठ्या

पावसाची दडी : संत्रा, कापूस, सोयाबीन, तुरीवर अवकळासुरेश सवळे - चांदूरबाजारतालुक्यात २४ दिवसांपासून पाऊस नसल्याने नैसर्गिक परिस्थितीचा परिणाम खरिपाच्या सर्वच पिकांवर जाणवू लागला आहे. यामुळे तालुक्यातील ५६ हजार ३९३ हेक्टरवरील खरिपाची पिके मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहेत. यंदा खरिपाच्या उत्पादनात ८० टक्क्यांपर्यंत घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा फटका तालुक्यातील ४३ हजार ५८५ शेतकऱ्यांना बसणार आहे. यावर्षी पावसाला एक महिना उशिराने सुरूवात झाली. त्यामुळे पेरणीचा काळ ३० दिवस पुढे लोटला गेला. पावसाला सुरूवात झाल्यानंतर ८ ते २० जुलै या कालावधीत तालुक्यात पेरणीला सुरूवात झाली. पेरणी झालेल्या शेतात नुकतीच बाळ रोपे तयार झाली असतानाच २४ ते २७ जुलैदरम्यान झालेल्या अतिवृष्टीने पिकांना चांगलाच फटका बसला. यातून पिके कशीबशी सावरायला सुरूवात झाली असतानाच २८ जुलैपासून तर आजतागायत पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. पावसाअभावी पिके व्हेंटीलेटरवर असतानाच अति उष्णतेचा शॉक या बाळ रोपांना बसला. त्यामुळे पिकाच्या नैसर्गिक वाढीच्या प्रक्रियेत बदल घडून आला. कमी कालावधीच्या पिकांमध्ये शाखीय वाढ थांबूून प्री-मॅच्युरिटीची स्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीमुळे सोयाबिनचे पीक अकाली फुलोरावर आले आहे. याचा सोयाबीनच्या उत्पादनावर मोठा परिणाम जाणवणार असल्याची चर्चा सुरू आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील २१ हजार ९० हेक्टरवरील खरिपाच्या सोयाबीन पिकांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. कपाशीची स्थिती पावसाच्या ताणानंतरही काही प्रमाणात ठीक असली तरी उत्पादनावर मोठा परिणाम जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे १५ मे ते ३० जूनपर्यंत पेरलेल्या कपाशीपेक्षा जुलै महिन्यात पेरलेल्या कपाशी पिकापासून मिळणारे उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा कमी होते. त्यात पावसाने दिलेला ताण व अतिउष्णतामानामुळे खरिपाच्या कोरडवाहू पिकांमध्ये कपाशीच्या फळ-फांद्यांची निर्मितीच झाली नाही. त्यामुळे कपाशीच्या एकूण उत्पादनापैकी शेतकऱ्यांच्या हाती केवळ २५ ते ३० टक्केच उत्पादन येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हवामानाच्या बदलाचा ८ हजार हेक्टरवरील संत्रा पिकालासुध्दा फटका बसला असून यंदा संत्रामृग बहर फुटलेलाच नाही. तर आंबिया बहरावर पाण्याच्या ताणाचा व उष्णतेचा परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात फळांची गळती होत आहे. त्यामुळे संत्रा पिकांचा कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय ठप्प पडला आहे. तालुक्यात सर्वात विदारक स्थिती ८ हजार ४०७ हेक्टरवरील तूर पिकांची झालेली आहे. २४ ते २७ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तुरीच्या पिकाला मर रोगाची लागण होऊन ८० टक्के पीक अक्षरश: जळून गेले आहे. त्यानंतर पेरलेल्या तुरीला निसर्गाने व वन्यप्राण्यांनी जगूच दिले नाही. उर्वरित तुरीच्या पिकांपासून उत्पादनापेक्षा गुरांच्या वैरणाचीच निर्मिती होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना उत्पादन आणि भाव यात दिलासा देणारे एकमेव तुरीचे पिकही शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे. मूग, उडीद व इतर पिके पूर्णत: कोमात गेली असून त्यापासून मिळणाऱ्या उत्पादनाची आशाच शेतकऱ्यांनी सोेडली आहे.