ऑनलाईन लोकमतधामणगाव रेल्वे : ३३ टक्क््यांपेक्षा अधिक बाधित झालेल्या बोंड अळीच्या अहवालात जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा समावेश करण्यात येणार आहे. या तालुक्यांना आगामी काळात नुकसानभरपाई मिळेल. यासंदर्भात नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांची मुंबईत भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली.शासनाच्या ७ डिसेंबरच्या आदेशान्वये जिल्ह्यात बोंड अळीमुळे ३३ टक्क््यांवर बाधित क्षेत्राचे संयुक्त सर्वेक्षण केले होते़ जिल्ह्यात १८३ कोटींचे नुकसान झाल्याचा अहवाल शासनाला पाठविला होता़ तद्नंतर १७ फे ब्रुवारीला महसुल विभागाने मंडळनिहाय अहवाल मागितला. यात १०२ कोटींचे नुकसान दाखविले होते़ मात्र, पीक कापणी प्रयोगाअंती दुसऱ्या अहवालात अमरावती, भातकुली, चांदूररेल्वे, दर्यापूर व धारणी तालुक्यांतील ४५ महसूल मंडळांचे उत्पन्न अधिक दाखविल्याने हे तालुके वगळले होते़ त्यामुळे येथील शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहिले.जिल्ह्यातील हे तालुके बोंड अळीने बाधित झाल्याची वस्तुस्थिती अहवालासह नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी बुधवारी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निदर्शनास आणली. संबंधित तालुक्यांचे पुन्हा सर्वेक्षण करून वगळलेल्या तालुक्यातील शेतकºयांना न्याय देण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जाणार असल्याचे कृषिमंत्री म्हणाले. या शेतकºयांना लाभ मिळण्याची आशा प्रताप अडसड यांच्या प्रयत्नामुळे पल्लवित झाली.
पाच तालुक्यांना मिळणार बोंड अळीची नुकसान भरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 01:44 IST
३३ टक्क््यांपेक्षा अधिक बाधित झालेल्या बोंड अळीच्या अहवालात जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा समावेश करण्यात येणार आहे. या तालुक्यांना आगामी काळात नुकसानभरपाई मिळेल.
पाच तालुक्यांना मिळणार बोंड अळीची नुकसान भरपाई
ठळक मुद्देकृषिमंत्र्यांचे आश्वासन : नगराध्यक्षांनी घेतली भेट