शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी आश्रमशाळेच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढू नये, हायकोर्टाचा महत्वपूर्ण आदेश

By गणेश वासनिक | Updated: July 17, 2023 15:07 IST

गोंदिया जिल्ह्यातील देवरी प्रकल्प कार्यालय अंतर्गत कर्मचाऱ्यांना न्याय

अमरावती : मागील ब-याच वर्षापासून शासकीय आदिवासी आश्रमशाळेत कार्यरत असलेल्या वर्ग ३ व ४ चे रोजंदारीवर कर्मचाऱ्यांना कामावरून काढू नये, असा महत्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १२ जुलै रोजी दिला आहे.

शैक्षणिक सत्र सन २०२३-२४ मध्ये अतिरिक्त सचिवांनी आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रमशाळा / वस्तीगृहामध्ये एकही कर्मचारी रोजंदारी/तासिका तत्त्वावर घेण्यात येऊ नये व बाह्यस्रोताद्वारे सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी पत्रक काढले होते.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देवरी जिल्हा गोंदिया येथील कार्यरत कर्मचारी कामेश कल्लो व ईतर यांनी दीर्घकाळापासून शासकीय आश्रम शाळेत कार्यरत असणाऱ्या याचिकाकर्त्यांना नियमाप्रमाणे कायमस्वरूपी व नियमित करण्यासाठी तसेच आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त सचिव मुंबई यांनी बाह्ययंत्रणामार्फत भरतीच्या काढलेल्या आदेशा विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका क्रमांक ४२९४/२०२३ दाखल केली होती.

बऱ्याच वर्षापासून याचिकाकर्त्यांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देवरी जिल्हा गोंदिया यांनी (वर्ग ३ व ४ पदांवर) विविध आश्रमशाळेत नियुक्तीचे आदेश दिले आहे. सदर याचिकाकर्ते दीर्घकाळापासून विविध ठिकाणी शासकीय आश्रमशाळेच्या सेवेत कार्यरत आहेत. वेळोवेळी राज्य शासनाने वस्तीशाळा तसेच आश्रमशाळा कर्मचा-यांना सेवेत सामावून घेण्यासाठी वेगवेगळे शासन निर्णय काढलेले आहेत.

मागील कित्येक वर्षापासून आश्रम शाळेत कार्यरत (वर्ग ३ व ४) चे रोजंदारीवर काम करणारे कर्मचाऱ्यांना सुदधा नियमित करण्यास शासन प्रयत्नशील असणार अशा प्रकारचा भास, याचिका दाखल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होती. परंतु त्यांना डावलून नव्याने बाह्ययंत्रणा मार्फत कर्माचारी भरती प्रक्रिया सुरू करण्याच्या हालचाली शासनस्तरावरून सुरू झाल्यामुळे त्या विरोधात याचिका दाखल करून शासनाच्या आदेशाला आव्हान देण्यात आले.

उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे ॲड. श्रावण ताराम आणि सरकारी वकिलांची बाजू ऐकूण न्यायमूर्ती ए. एस. चांदूरकर. व न्या. वि. वि. जोशी यांनी १२ जुलै २०२३ रोजीच्या आदेशान्वये प्रतिवादी सरकार आणि आदिवासी विकास विभाग यांना नोटीस बजावण्यात आली. याचिकाकर्तांना सेवेतून काढले जाऊ नये, अशा प्रकारचा संरक्षित करण्याचा महत्त्वपूर्ण अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पारित केला आहे.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालय