शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

बापरे! आईच्या दबावामुळे १३ वर्षीय मुलगी ठरली ‘बालिकावधू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2022 14:57 IST

आरोपी पतीने लग्न झाल्याापासून पीडितेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. अखेर त्या अनन्वित शारीरिक, मानसिक छळाला कंटाळून तिने मामीचे घर गाठले व मामीकडे आपबीती कथन केली.

ठळक मुद्देपतीकडून वारंवार लैंगिक शोषण : आईसह सात जणांविरुद्ध गुन्हा, पती, सासरा, मामा, मामीही आरोपी

अमरावती : अवघ्या १३ वर्षीय बालिकेचे जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले. त्या बालविवाहानंतर पीडिता बालिकेचे कथित पतीने वारंवार लैंगिक शोषण केले. परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ५ मार्च ते ९ जून दरम्यान ही अश्लाघ्य घटना घडली.

ही आपबीती बालिकेने आपल्या मामीला सांगितली. त्यानंतर हा प्रकार उघड झाला. विशेष म्हणजे आईनेच भाऊ व भावजयींच्या सहकार्याने पोटच्या मुलीचा बालविवाह घडवून आणला. याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी एका ४० वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून पीडित मुलीची आई, पती सागर पवार (३०), सासू रत्ना पवार (४५), मामा विजू सूर्यवंशी (४८), मामी सविता सूर्यवंशी, जेठ रवी पवार (३२), जेठाणी पूजा पवार (२८. सर्व रा. पांढरी) यांच्याविरूद्ध भादंविच्या कलम ३७६, ३७६ (२), जे, ३७६ (२) (एन), ३७६ (३), पोक्सोचे कलम ६, १२ व बालविवाह प्रतिबंधक अधिनियमातील कलम ९, १०, ११ अन्वये गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, पीडित १३ वर्षीय मुलगी फिर्यादी महिलेची भाची असून, पीडितेच्या आईसह सहा जणांनी त्या मुलीचा सागर पवार याच्यासोबत बळजबरीने विवाह लावून दिला. फिर्यादी महिलेला तो विवाह मान्य नसल्याने ती त्या लग्नात गेली नाही. आरोपी पती व सासरकडील अन्य मंडळी बालवधूला गावी घेऊन गेली. आरोपी पतीने लग्न झाल्याापासून पीडितेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. अखेर त्या अनन्वित शारीरिक, मानसिक छळाला कंटाळून तिने मामीचे घर गाठले. मामीकडे आपबीती कथन केली. मामीने तिला घेऊन ९ जून रोजी रात्री परतवाडा पोलीस ठाणे गाठले. रात्री १०.५२ च्या सुमारास पीडितेच्या आई व अन्य सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. १५ दिवसांपूर्वीही असाच एक प्रकार उघडकीस आला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्नamravati-acअमरावती