शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

'केबल वॉर'मुळे ग्राहकांनाच मन:स्ताप

By admin | Updated: March 29, 2016 00:15 IST

विविध केबल कंपन्यांचे जाळे शहरात पसरल्याने आता स्पर्धा करण्यासाठी एकमेकांची केबल तोडण्याचा प्रताप काही केबल आॅपरेटर करीत आहेत.

एकमेकांचे केबल तोडले : क्रिकेट सामन्याच्या दिवशीच प्रक्षेपण बंदअमरावती : विविध केबल कंपन्यांचे जाळे शहरात पसरल्याने आता स्पर्धा करण्यासाठी एकमेकांची केबल तोडण्याचा प्रताप काही केबल आॅपरेटर करीत आहेत. रविवारी भारत-आॅस्ट्रेलियात झालेल्या सामन्यादरम्यान शहरात केबल वॉरचा प्रकार उघड झाला असून केबल प्रक्षेपण बंद झाल्याने ग्राहकांनाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरात केबल व्यवसाय करणाऱ्या तीन कंपन्या विविध परिसरात केबलचे जाळे पसरवीत आहेत. प्रत्येक परिसरात तिन्ही कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे खेचण्याचे काम करीत असून एकमेकांचे केबल तोडून टीव्हीवरील प्रक्षेपण बंद करण्याचे प्रकार करीत आहेत. रविवारी भारत-आॅस्ट्रेलिया क्रिकेट मॅच दरम्यान शहरातील तब्बल १०० ते १२० ठिकाणी केबल तोडण्यात आल्याने खळबळ उडाली. केबल तोडल्यामुळे शहरातील बहुतांश केबल ग्राहकांच्या घरचे टीव्ही संच अचानक बंद पडले. केबल अचानक बंद झाल्यामुळे केबल आॅपरेटरांनी फॉल्ट शोधण्याची धावपळ सुरू केली. यामध्ये काही जणांचा रंगेहातसुध्दा पकडले आहे. मात्र, हा प्रकारावरून वादविवाद सुध्दा झाले. त्यामुळे केबल वॉरमुळे हाणामारीचे प्रकारसुध्दा तसेच विरुद्ध कंपनीचे कर्मचारी हल्लेसुध्दा करीत असल्याची ओरड केबल चालकांची आहे. रविवारी राजकमल उड्डान पुल्यावरून गेलेले केबल तोडण्यात आले होते. त्यामुळे अमरावती-बडनेरा मार्गावरील बहुतांश केबल प्रक्षेपण बंद झाले होते. केबल बंदचा सर्वाधिक फटका ग्राहकांनाच सहन करावा लागत असल्याचे आढळले.यासंदर्भात केबल चालकांनी विविध पोलीस ठाण्यात तक्रारीसुध्दा नोंदविल्यात. हे केबल वॉर असेच सुरू राहिल्यास मोठी घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बच्चू कडू पोहोचले सीपींच्या दालनातशहरातील केबल वॉरची स्थिती पाहता एका कंपनीच्या केबलचालकाने आमदार बच्चू कडू यांच्याकडे धाव घेतली. त्यांची रास्त बाजू ऐकून आ.बच्चू कडू यांनी तत्काळ दखल घेत रविवारी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांची भेट घेतली. त्यांच्या समक्ष केबल तोडण्याचा प्रकार त्यांनी सांगितला. यासंदर्भात पोलीस उपायुक्तांमार्फत चौकशी करून लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन आयुक्तांनी आ.कडू यांना दिले आहे. ३१ मार्चला अ‍ॅनालॉग सिग्नल बंद होणारशासनाने सेटटॉप बॉक्स बसविण्यासाठी ३१ डिसेंबर डेडलाईन दिली होती. त्याच दिवशी अ‍ॅनालॉग सिग्नल बंद करण्यात आले होते. मात्र, अंतिम तारखेपर्यंत बहूतांश केबल आॅपेरटरांनी ग्राहकांच्या घरी सेटटॉप बसविले नव्हते. त्यामुळे काही केबल चालकाने न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार अ‍ॅनालॉग सिग्नल सुरु ठेवण्याला मुदतवाढ मिळाली होती. आता ती मुदत ३१ मार्च रोजी संपणार असून अ‍ॅनालॉग सिग्नल बंद होण्याची शक्यता आहे. शहरातील काही ठिकाणी केबल तोडण्याचे प्रकार सुरू आहेत. त्याबद्दल उपायुक्तांकडून माहिती मागविण्यात आली आहे. त्यासंदर्भाने आ.बच्चू कडू हे भेटायला आले होते. याप्रकाराची पोलीस उपायुक्तांमार्फत चौकशी करून लवकरच तोडगा काढू. - दत्तात्रेय मंडलिक, पोलीस आयुक्त.