शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
3
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
4
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
5
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
6
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
7
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
8
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
9
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
10
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
11
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
12
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
13
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
14
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
15
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
16
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
17
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
18
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
19
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
20
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार

गुन्हेगारीवर अंकुश लावा, अन्यथा कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 23:01 IST

शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील विविध ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी रात्रकालीन गस्तीत सर्चिंग आॅपरेशन सुरू केले. शहरात नुकत्याच घडलेल्या दोन हत्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त दत्तात्रय मडंलिक यांनी सर्व ठाण्यांना सक्त निर्देश दिले आहेत. गुन्हेगारीवर अंकुश लावा, अन्यथा मोठी अ‍ॅक्शन घेईन, अशी तंबी आयुक्तांनी ठाणेदारांना दिली आहे.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांचे सक्त निर्देश : हॉटेल, ढाबे, लॉज तपासणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील विविध ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी रात्रकालीन गस्तीत सर्चिंग आॅपरेशन सुरू केले. शहरात नुकत्याच घडलेल्या दोन हत्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त दत्तात्रय मडंलिक यांनी सर्व ठाण्यांना सक्त निर्देश दिले आहेत. गुन्हेगारीवर अंकुश लावा, अन्यथा मोठी अ‍ॅक्शन घेईन, अशी तंबी आयुक्तांनी ठाणेदारांना दिली आहे.गुन्हेगारीवर अंकुश लावण्याचे पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांनी स्वत:ही 'आॅल आऊट' आॅपरेशन राबवून शहरात पोलिसी खाक्याचा दबदबा निर्माण केला. त्यानंतर काही दिवस गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, आता पुन्हा गुन्हेगारीने तोंड वर काढले असून, आयुक्तांच्या अधिनस्थ यंत्रणा पुन्हा पूर्वीच्या खाक्याने काम करीत असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास येत आहे. त्यातच आयुक्तालय हद्दीत घडलेले दुहेरी हत्याकांड व पाठोपाठच सातुर्णा येथील युवकाच्या हत्येने पुन्हा अमरावतीकरांच्या मनात धडकी भरली आहे. गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी रात्रीच्या सुमारास गस्त लावण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. शुक्रवारी पोलिसांनी शहरातील हॉटेल, लॉज, धाब्यासह पानटपरी, अंडा सेंटर, चायनिज हातगाड्यांची झडती घेतली. संशयितांची विचारपूस करून त्यांची अंगझडतीसुद्धा घेतली. रात्री १० ते १२ दरम्यान विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हे सर्च आॅपरेशन राबविले. यादरम्यान पोलिसांनी अनेकांवर कारवाईचा केली. मर्यादेपेक्षा अधिक वेळ व्यवसाय सुरू ठेवणाऱ्यांवर बडगा उगारण्यात आला. राजापेठ हद्दीत १२ जणांवर कारवाई करण्यात आली असून, गाडगेनगर हद्दीतसुद्धा काही संशयिताची कसून चौकशी करण्यात आली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता, शहरातील रात्रीच्या वेळेत अनेक गुंड प्रवृत्तीचे तरुण फिरताना आढळून येतात. बारमध्ये मद्यप्राशन करून बाहेर आल्यानंतर धिंगाणा घालतात. अशाप्रसंगी वाद होऊन मोठ्या घटना घडण्याची शक्यता असतो. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी दररोज नाइट राऊंड घेऊन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांवर वॉच ठेवावा, असे निर्देश पोलीस आयुक्तांना ठाणेदारांना दिले आहेत. पोलिसांच्या झाडाझडतीने अनेकांचे धाबे दणाणणे होते.रात्रीच्या वेळेत गस्त लावून गुन्हेगारी प्रवृत्तीवर लक्ष ठेवून कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. पोलिसांनी योग्य रीतीने काम न केल्यास त्यांच्यावर मोठी अ‍ॅक्शनसुद्धा घेण्यात येईल.- दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त.