शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटच्या जंगलात छावा मृतावस्थेत आढळला; अधिकारी घटनास्थळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 16:35 IST

चौराकुंड परिक्षेत्रातील घटना; रानडुकराचीही शिकार 

अमरावती: मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत सिपना वन्यजीव विभागातील चौराकुंड परिक्षेत्रातील जंगलात शनिवारी वन कर्मचाऱ्याना गस्तीदरम्यान मृत छाव्याचे अवयव आढळून आले. तर एका मोठ्या रानडुकराची शिकार वन्यप्राण्याने केल्याचेही त्याचवेळी उघड झाले. या संपूर्ण घटनेच्या तपासासाठी व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी जंगलात तळ ठोकून आहेत. मृत छावा मादा आहे. चौराकुंड वनपरिक्षेत्र अंतर्गत असलेल्या उत्तर चौराकुंड नियत क्षेत्रात कक्ष क्रमांक ५७९ मध्ये वन कर्मचारी गस्तीवर असताना त्यांना वाघाच्या छाव्याचा तुटलेला मागील पायाचा पंजा आढळून आला. पुढे जाताच त्यांना काही अंतरावर एका मोठ्या रानडुकराची शिकार झाल्याचे निदर्शनात आले. वाघाच्या छाव्याचे  इतर अवयव शोधत असताना शंभर मीटर अंतरावर त्याचे डोके व पुढचे पाय आढळून आले, तर मागचे शरीर एखाद्या वन्यप्राण्याने खाल्ल्याचे प्रथमदर्शी उघड झाले आहे. छाव्याच्या मानेवर वन्यप्राण्यांच्या दाताचे निशाण आढळून आले आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे  अप्पर प्रधान संरक्षक तथा क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली उपवनसंरक्षक पीयूषा जगताप, सहायक वनसंरक्षक कमलेश पाटील, वनपरिक्षेत्राधिकारी निर्मळ व व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी तपास करत आहेत. घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी पोहोचले आहेत.

अकोट येथून आणला डॉग स्कॉडवाघाच्या छाव्याचा पंजा जंगलात आढळून येताच व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाºयांनी अकोट वन्यजीव विभागातील प्रशिक्षित डॉग स्कॉडला पाचारण केले आहे. वाघाच्या बछड्यावर  कुठल्या वन्यप्राण्याने हल्ला केला व त्याचे अवयव धडावेगळे केले, या दिशेने तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, रानडुकराची शिकार केल्याचे उघड झाल्यानंतर बछड्याच्या मृत्यूने घायाळ झालेली वाघीण परिसरातच फिरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करण्यात येत आहे.