शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
2
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
3
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
4
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
5
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
6
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
7
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
8
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
9
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
10
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
11
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
12
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
13
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
14
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
15
Varlin Panwar : वडील आर्मी ऑफिसर, लेकही होती IAF स्क्वाड्रन लीडर; आता प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सना देतेय ट्रेनिंग
16
वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
17
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर
18
Rohit Pawar: समविचारी पक्ष सोबत आले तर ठिक, नाही तर...; रोहित पवार स्पष्टच बोलले
19
बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...
20
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू

नातेवाईकांची क्रुरता; घरात डांबून १६ वर्षीय मुलाला दिले गरम झाऱ्याने चटके

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 21:12 IST

बडनेरा येथील घटना : आईची पोलिसांत तक्रार, पाच आरोपींना अटक

बडनेरा (अमरावती) : खोलीत डांबून एका सोळा वर्षीय मुलाला जबरदस्तीने दारू पाजून त्याला गरम झाºयाने चटके दिल्याची घटना बडनेरा येथे घडली. पीडित मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून शनिवार उशिरा रात्री बडनेरा पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंदवून अटक केली.

प्रशांत शेषराव मढाईत (४४), अरूण मेश्राम (५०), कैलास राऊत (६२), ऋषिकेश (किराणा दुकानदार, रार्व रा. बडनेरा) व रमेश बागडे (४२, रा. कारंजा लाड) अशी आरोपींची नावे आहेत. या घटनेची तक्रार वंदना राजेश ऊके (५०, रा. ऊमरेड, जि. नागपूर) यांनी बडनेरा पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार माझा मुलगा हिमांशू राजेश ऊके याला आरोपींनी घरात डांबून दारू पाजून बेशुद्ध केले. त्यानंतर गरम झाºयाचे चटके दिले. ही घटना होळीच्या रात्री घडली. या घटनेची तक्रार शनिवारला देण्यात आली. बडनेरा पोलिसांनी भादंविच्या कलम १४३, १४९, ३२८, ३२४, ३२३, ३३६, ३३७, ३६२, ३५२, ५०६ सहकलम बालकांची काळजी सुधारणा अधिनियम ७७ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. यातील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 

पीडित मुलाच्या मांडीवर तसेच शरीराच्या इतरही भागांवर गंभीर चटके दिले. सदर घटना गांधी विद्यालयाजवळील कैलास राऊत याच्या घरी घडल्याचे तक्रारकर्ती आईचे म्हणणे आहे. या घटनेत दुसºया एका मुलालासुद्धा अशाच प्रकारे चटके दिल्याची चर्चा आहे. मात्र त्याने नातेवाईकांनी याची वाच्यता पोलीस ठाण्यात केलेली नाही. घटनास्थळावरून पोलिसांनी झारा जप्त केला आहे. सर्व आरोपींना रविवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता, त्यांना २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

चटके देणाऱ्यांमध्ये शिक्षकाचा समावेशपीडित मुलाला खोलीत डांबून त्याला गरम झाºयाचे चटके देण्यात आले. यातील पाच आरोपींपैकी एक शिक्षक आहे. शिक्षकाला असे कृत्य करणे शोभले का, असा सवाल या अमानुष कृत्यानंतर नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.

 

चटके देण्याच्या घटनेतील सर्व आरोपींना अटक करण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे दाखल करण्यात आले. सखोल चौकशी केली जात आहे. - शरद कुळकर्णी,पोलीस निरीक्षक, बडनेरा

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी