शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

तळीरामांची दुकानांवर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 05:01 IST

घरपोच दारू सुविधेचा मंगळवारी दुसरा दिवस होता. पोलीस, एक्साईजचे अधिकारी दारू विक्री दुकानांवर लक्ष ठेवून होते. घरपोच दारू ही आॅनलाईन नोंदणीनंतरच मिळेल, असे आदेशात स्पष्ट नमूद आहे. मात्र, तळीरामांना केवळ दारू हवी आहे, परवाना वगैरे याचे काहीही घेणेदेणे नाही, अशी दुकानांवर सकाळी १० वाजतापूर्वीच गर्दी करण्यात आली होती.

ठळक मुद्देघरपोच दारूचे नियोजन फेल : सकाळी दुकानांसमोर गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सोमवारपासून घरपोच दारूची सुविधा सुरू करण्यात आली असली तरी मद्यासाठी तळीरामांची दुकानांवर तुफान गर्दी चालविली आहे. अमरावती महानगरात जवळपास वाईन शॉप, बिअर शॅपीवर हे दृश्य मंगळवारी अनुभवता आले. दारू पिण्याचा परवाना असलेल्या व्यक्तीलाच घरपोच दारू मिळेल, अशी नियमावली आहे. तथापि, बहुतांश तळीरामांनी थेट दुकानातून दारू विकत घेण्यासाठी रस्सीखेच केली.घरपोच दारू सुविधेचा मंगळवारी दुसरा दिवस होता. पोलीस, एक्साईजचे अधिकारी दारू विक्री दुकानांवर लक्ष ठेवून होते. घरपोच दारू ही आॅनलाईन नोंदणीनंतरच मिळेल, असे आदेशात स्पष्ट नमूद आहे. मात्र, तळीरामांना केवळ दारू हवी आहे, परवाना वगैरे याचे काहीही घेणेदेणे नाही, अशी दुकानांवर सकाळी १० वाजतापूर्वीच गर्दी करण्यात आली होती. दारू विक्री दुकानांच्या बाहेर घरपोच दारू सुविधांसाठी मोबाइल क्रमांक, व्हाट्अप, मॅसेज, फोन नंबर देण्यात आले आहेत. मंगळवारपासून १८ वाईन शॉप, १६ बिअर शॉपीतून आॅनलाईन नोंदणीअंती घरपोच दारू मिळविता येईल, असे एक्साईजने स्पष्ट केले आहे.नवाथेनगर, कॅम्प, रूक्मिणीनगर, कंवरनगर, सहकार भुवनसमोर, राजापेठ, गाडगेनगर या भागातील दारू दुकानांवर प्रचंड गर्दी करण्यात झाल्याची माहिती आहे. थेट दारू विकत मिळणार नाही, असे निश्चित असताना तरिही तळीरामांनी गर्दी केल्यामुळे विक्रेत्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. घरपोच दारू सुविधेचे नियोजन हाताळण्यास प्रशासन फेल झाल्याचे चित्र आहे.परमीट रूममधून सीलबंद दारू विक्रीपरमीट रूम धारकांना (एफएल-३) बिअर, दारू सीलबंद विकता येणार आहे. लॉकडाऊनच्या काळात ज्यांच्याकडे साठा शिल्लक आहे, त्यांना मद्यसाठा संपेपर्यंत विक्री करण्यास परवानगी असल्याचे गृहविभागाचे कार्यासन अधिकारी सु.श. यादव यांनी १९ मे रोजी आदेशानुसार स्पष्ट केले आहे.दुकानांसमोर दारू विकत मिळणार नाही, असे ठळकपणे फलक लावण्यात येणार आहे. घरपोच दारू सुविधेसाठी आॅनलाईन नोंदणी अनिवार्य आहे. आता गर्दी कमी करण्यासाठी ई-टोकन प्रणालीची अंमलबजावणी केली जाणार आहे. परवानाशिवाय कुणालाही दारू मिळणार नाही.- राजेश कावळे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अमरावती

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदा