शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींचा चुराडा; राज्यातील २३६४ 'मोटर ॲम्ब्युलन्स' प्रकल्प धूळखात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 13:26 IST

Amravati : ट्रॅफिक आणि अरुंद गल्ल्यांमध्ये तातडीने पोहोचण्यासाठी राज्य सरकारने मोठ्या थाटामाटात सुरू केलेला 'मोटर अॅम्ब्युलन्स' प्रकल्प आता पूर्णपणे कोलमडला आहे.

गणेश वासनिक लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ट्रॅफिक आणि अरुंद गल्ल्यांमध्ये तातडीने पोहोचण्यासाठी राज्य सरकारने मोठ्या थाटामाटात सुरू केलेला 'मोटर अॅम्ब्युलन्स' प्रकल्प आता पूर्णपणे कोलमडला आहे. २०१८ मध्ये खरेदी करण्यात आलेल्या एकूण २,३६४ मोटर रुग्णवाहिकांपैकी आज राज्यात एकही कार्यान्वित नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या महागड्या बुलेट रुग्णवाहिका नेमक्या गेल्या कुठे आणि त्या भंगारात कशा निघाल्या, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

मुंबईसारख्या गर्दीच्या -शहरात आणि ग्रामीण भागातील दुर्गम रस्त्यांवर मोठी रुग्णवाहिका वेळेत पोहोचू शकत नाही. यावर उपाय म्हणून राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई अंतर्गत तत्कालीन ईएमएस प्रकल्प संचालक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली २०१८ मध्ये हा प्रकल्प राबवण्यात आला. या खास 'बुलेट अॅम्ब्युलन्स' तयार करून त्या चालवण्यासाठी बीव्हीजी इंडिया, पुणे या संस्थेला देण्यात आल्या होत्या. प्रत्येक मोटर रुग्णवाहिकेवर एक डॉक्टर आणि एक चालक अशा दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष

१ २०१८ नंतर या धक्कादायक बाब म्हणजे, रुग्णवाहिकांचे काय झाले, त्या सध्या कोणत्या स्थितीत आहेत आणि त्यांचा सांगाडा कुठे पडला आहे, याची साधी विचारणाही आरोग्य विभागाने केलेली नाही. जनतेच्या करातून जमा आलेला पैसा अशा प्रकारे नियोजनशून्य कारभारामुळे व्यर्थ गेल्याने संताप व्यक्त होत आहे. सध्या महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा अंतर्गत नवीन १०८ रुग्णवाहिकांचा ताफा येत असला तरी, जुन्या 'मोटर रुग्णवाहिकां'बाबत अधिकारी मौन बाळगून आहेत.

सहा महिन्यांतच प्रकल्प 'भंगारात'

मोठ्या गाजावाजा करून सुरू झालेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अवघ्या सहा महिन्यांतच बंद पडला. रिमोट भागात कर्मचाऱ्यांची कमतरता आणि त्यातच मिळणारा तुटपुंजा पगार यामुळे कर्मचारी या कामात टिकले नाहीत. देखभालीअभावी या २,३६४ बुलेट रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला उभ्या राहिल्या आणि हळूहळू त्या भंगारात निघाल्या. या प्रकल्पासाठी खर्च झालेले कोट्यवधी रुपये अक्षरशः पाण्यात गेले.

रुग्णवाहिकांचे ही होती आधी स्थाननिश्चिती

  • मुंबई: वी. एन. देसाई रुग्णालय सांताकुझ, मरोळ मॅटिनिटी होम अंधेरी पूर्व, बैल बाजार मॅटिनिटी होम, कुर्ला पश्चिम, जोतिबा फुले रुग्णालय विक्रोळी, जि. साऊथ वर्ड ऑफिस एलिफीस्टन, मॅटिनिटी होम माहिम पूर्व, सी. वार्ड ऑफिस काळबा देवी, होली फॅमिली रुग्णालय वांद्रे पश्चिम.
  • अमरावती : मेळघाटातील बैरागड, हरिसाल, टेंभुसोंडा, काटकुंभ, चुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र.
  • गडचिरोली : वडसा ग्रामीण रुग्णालय.
  • पालघर : नांदगाव, मडवाडा, तालवाड, गंजाड, मासवान येथील प्राथमिक आरोग्य केंद्र.
  • सोलापूर : पंढरपूर ग्रामीण रुग्णालय.
English
हिंदी सारांश
Web Title : Millions wasted: Maharashtra's 2364 'Motor Ambulance' project gathers dust.

Web Summary : Maharashtra's 'Motor Ambulance' project, launched in 2018 to navigate traffic, has collapsed. All 2,364 purchased ambulances are defunct. Neglect and poor planning led to the failure, wasting public funds while officials stay silent.
टॅग्स :nagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र