शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

राज्य शासनाच्या दलितवस्ती सुधार योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 10:41 IST

राज्य शासनाच्या दलितवस्ती सुधार योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी नागपूर येथील महालेखाकार कार्यालयाने (कॅग) आक्षेप नोंदविले आहेत.

ठळक मुद्देप्रायोगिक तत्त्वावर तपासले आठ जिल्हे‘कॅग’च्या अनुपालनात शासन नापास

गणेश वासनिकआॅनलाईन लोकमतअमरावती : राज्य शासनाच्या दलितवस्ती सुधार योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी नागपूर येथील महालेखाकार कार्यालयाने (कॅग) आक्षेप नोंदविले आहेत. ‘कॅग’च्या अनुपालनात राज्य शासन नापास झाले असून, दोषींवर अद्यापही कारवाई नाही, असे अहवालात नमूद आहे.शासनाने दलितवस्तीत पाणीपुरवठा, मलनि:सारण, पोच रस्ते, अंतर्गत रस्ते, वीजपुरवठा, समाजमंदिर, आवास आदी मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी १९७४ मध्ये ‘दलितवस्ती सुधार योजना’ अंमलात आणली. डिसेंबर २०११ मध्ये योजनेचे ‘अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तींचा विकास’ असे नामकरण करण्यात आले. ‘कॅग’ने योजनेसंदर्भात प्रायोगिक तत्त्वावर अकोला, औरंगाबाद, बीड, चंद्रपूर, लातूर, नाशिक, रत्नागिरी आणि ठाणे या आठ जिल्ह्यांतील विकासकामांचे लेखापरीक्षण केले. यामध्ये धक्कादायक वास्तव पुढे आले. १६ तालुक्यांतील ८० ग्रामपंचायतींनी योजनेचा बट्ट्याबोळ केल्याचा आक्षेप ‘कॅग’ने मार्च २०१५ मध्ये नोंदविला. त्यानंतर शासनानेदेखील ही बाब मान्य करीत ‘कॅग’ने सुचविलेल्या अनुपालनाची अंमलबजावणी केली जाईल, अशी कबुली दिली. तथापि, दीड वर्षांत भ्रष्टाचारप्रकरणी कुणावरही कायदेशीर कारवाई केलेली नाही.खरे तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये योजनांमध्ये भ्रष्टाचार किंवा अपहार झाला असेल, तर ही बाब पंचायत राज समितीने (आॅडिट लोकल फंड) शासनाच्या लक्षात आणून देणे महत्त्वाचे आहे. राज्यात ३५ जिल्ह्यांमध्ये आॅडिट लोकल फंडची स्वतंत्र निर्मिती आहे. परंतु, आॅडिट लोकल फंडही या भ्रष्टाचाराबाबत मौन बाळगून आहे. डीपीआर समानतेअभावी जास्त अनुदानाचे वाटपदलितवस्ती सुधार योजनेंतर्गत २००८ ते २०१३ दरम्यान विकासकामे करताना प्रथम बृहत् आरखडा (डीपीआर) सन २००८-२००९ पासून क्रियाशील होता. तथापि, सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाने पंचवार्षिक डीपीआर तयार करण्यासाठी कोणतेही प्रमाण प्रपत्र नेमून दिले नव्हते. त्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समित्यांच्या डीपीआरमध्ये समानता नव्हती. ग्रामपंचायतीसुद्धा विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवू शकल्या नाहीत. यामुळे मंजुरीपेक्षा जास्त अनुदान देण्यात आले, असे ‘कॅग’ने अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा