शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

३३ हजार हेक्टरमधील पिके बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 05:01 IST

सप्टेंबर महिन्यात सातत्याने पाऊस सुरूच आहे. ७ व ९ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, नांदगाव खंडेश्वर, अमरावती, भातकुली, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, तिवसा व धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यामध्ये मूग, उडीद, सोयाबीन, कापूस व तूर पिकांचा समावेश आहे. जिल्हा अधीक्षक कृषी विभागाच्या माहितीनुसार, ३३ हजार हेक्टरवर क्षेत्रात हे नुकसान झालेले आाहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात ७ व ९ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे नऊ तालुक्यातील ५२० गावे बाधित झाली. यात ३३,०९९ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला सादर केला.सप्टेंबर महिन्यात सातत्याने पाऊस सुरूच आहे. ७ व ९ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, नांदगाव खंडेश्वर, अमरावती, भातकुली, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, तिवसा व धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यामध्ये मूग, उडीद, सोयाबीन, कापूस व तूर पिकांचा समावेश आहे. जिल्हा अधीक्षक कृषी विभागाच्या माहितीनुसार, ३३ हजार हेक्टरवर क्षेत्रात हे नुकसान झालेले आाहे. महसूल विभागाच्या प्राथमिक अहवालात १० हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचे दर्शविण्यात आलेले होते.  यामध्ये अंजनगाव सुर्जी तालुक्यात २९ गावांमध्ये ७०० हेक्टर, दर्यापूर तालुक्यात ९० गावांमध्ये ८४८ हेक्टर, अमरावती तालुक्यात ७९ गावांमध्ये १३ हजार हेक्टर, भातकुली तालुक्यात ९८ गावांमध्ये ३,८२१ हेक्टर, चांदूर बाजार तालुक्यात एका गावात ३८ हेक्टर, चांदूर रेल्वे तालुक्यात ५७ गावांमध्ये २,४७५ हेक्टर, तिवसा तालुक्यात ६० गावांमध्ये १,३१३ हेक्टर व धामणगाव रेल्वे तालुक्यात ८१ गावाममध्ये २,८५१ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झालेले आहे.

१,९३८८ घरांची पडझड, १.५१ कोटींची मागणीया अतिवृष्टीमध्ये १९३८ घरांची पडझड झालेली आहे.  याकरिता जिल्हा प्रशासनाने १,५१,४९,१०१ रुपयांची मागणी शासनाकडे केलेली आहे. याशिवाय ९४ पशुधनाची हानी झालेली आहे. याकरिता ३,२८,१०० रुपयांची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. याशिवाय यंदाच्या पावसाळ्यासह एप्रिल व मे महिन्यातील अवकाळीमुळे ३,५८८ घरांचे नुकसान झालेले आहे. याकरिता २.६७ कोटींची मागणी जिल्हा प्रशासनाने केलेली आहे.

 

टॅग्स :floodपूरagricultureशेती