शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस बेपत्ता झाल्याने वृक्षलागवडीला ‘ब्रेक’, 33 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमावर संकट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 17:51 IST

पाऊस बेपत्ता : रोपांना टँकरने पाणीपुरवठा 

ठळक मुद्देराज्यात विदर्भ वगळता अन्य ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला आहे.विदर्भात पावसाचे दिवस लक्षात घेता आणि हवामान खात्याशी संपर्क साधून वृक्षलागवड करण्याचा सूचना दिल्या आहेत.

गणेश वासनिक

अमरावती : गत आठवड्याभरापासून पाऊस बेपत्ता झाल्याने राज्यात 1 जुलैपासून सुरू झालेल्या 33 कोटी वृक्षलागवडीला विदर्भात ब्रेक लागले आहे. एकूणच वृक्षलागवड कार्यक्रमावर संकट ओढवले असून, बहुतांश भागात रोपांना टँकरने पाणीपुरवठा करून ती जगविली जात आहेत.

राज्यात विदर्भ वगळता अन्य ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला आहे. 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत वृक्षलागवड राबविण्यात येत आहे. मात्र, विदर्भातून 4 ते 5 जुलैपासून पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकऱ्यांसह  वनविभागालासुद्धा वरूणराजाची प्रतीक्षा लागून आहे. वनविभागाला जुलै महिन्यात वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. तथापि, पाऊस गायब झाल्याने वृक्षलागवडीचे नियोजन कसे पूर्ण करणार, हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. नागपूर व अमरावती विभागात 10 ते 12 टक्केच वृक्षलागवड झाली आहे. प्रत्येक जिल्ह्याला एक कोटी ते सव्वा कोटी असे वृक्षलागवडीचे टार्गेट आहे. परंतु, पावसाने दडी मारल्याने विदर्भात एकूणच वृक्षलागडीचे नियोजन बारगळले आहे. गोंदिया, भंडारा जिल्हा वगळता अन्य जिल्हे वृक्षलागवडीत माघारले आहे. अमरावती, अकोला, वाशीम, नागपूर, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्याची विदारक स्थिती आहे.

रोपांना टँकरने पाणीपुरवठा33 कोटी वृक्षलागवडीकरिता नर्सरीतून रोपे मागविण्यात आलीत. मात्र, पाऊस बेपत्ता झाल्याने वृक्षलागवडसुद्धा लांबली. आता ‘स्पॉट’वर रोपे जगविण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ही स्थिती संपूर्ण विदर्भाची आहे. वृक्षलागवडीनंतर रोपांना जगविणे वनविभागासह शासनाच्या अन्य यंत्रणांसाठी मोठे जिकरीचे काम झाले आहे.   आंध्रप्रदेश, केरळ, तेलंगणातून मागविली रोपेराज्यात 33 कोटी वृक्षलागवडीसाठी सागवानची रोपे आंध्रप्रदेश, केरळ, तामिनलाडू, तेलंगणा येथून मागविली आहे. 50 टक्के वृक्षलागवड ही सागवान रोपांचे करण्याचे नियोजन आहे. मात्र, राज्यात सागवान रोपांची निर्मिती कमी प्रमाणात झाली. त्यामुळे परप्रातांतून सागवान रोपे मागविण्यात आली आहे. सागवान रोपांना जगविण्यासाठी वनविभागाला कसरत करावी लागत आहे.     विदर्भात पावसाचे दिवस लक्षात घेता आणि हवामान खात्याशी संपर्क साधून वृक्षलागवड करण्याचा सूचना दिल्या आहेत. मोठ्या स्वरूपाची वृक्षलागवड थांबविली असून, छोट्या स्वरूपाची वृक्षलागवड सुरू राहील.- सुधीर मुनगंटीवार,अर्थ व वनेमंत्री, महाराष्ट्र 

टॅग्स :environmentपर्यावरणSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार