लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : तालुक्यात सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे यावर्षीही निसर्गाने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिसकला असून त्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. तालुक्यात सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव तर मुंग व उडीद १०० टक्के हातातून गेले आहे.तालुक्यात पडणारा अतिपाऊस पिकांसाठी हानिकारक ठरत आहे. या पावसाने अल्पावधीतच हातात येणारे मूग व उडीद हे पिक पूर्णत: उध्वस्त केले असल्याची शेतकरी वर्गांमध्ये चर्चा आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीनवर सुद्धा विविध प्रकारच्या किडीने मोठ्या प्रमाणात आक्रमण केले आहे. पाने खाणाऱ्या अळीने पिकाची चाळणी केली आहे. तर सोयाबीन पिवळे पडू लागले आहे.यासोबतच कपाशी हे पीक अतिपावसामुळे पिवळे पडत आहे. तर कपाशीला लागलेली बोंडे पावसाने सडत असल्याचे चित्र आहे. तर ज्या ठिकाणी शेतात पाणी साचले असेल त्या ठिकाणी तूर पीक पिवळी पडून सडू लागले असल्याचे चित्र आहे. या पावसामुळे संत्रा फळगळ सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. यामुळे तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी सुद्धा चिंतेत सापडला आहे. कोरोनामुळे आधीच शेतकºयांच्या पिकाला पाहिजे तसा भाव न मिळाल्यामुळे मोठे नुकसान झाले होते. मात्र खरिपातील पिक परिस्थिती सुरूवातीच्या भरघोस पावसाने चांगली असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. मात्र गेल्या काही दिवसात तालुक्यात झालेल्या अति पावसामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट ओढवले आहे. एकंदरितच नगदी पीक म्हणून सोयाबिनकडे वळलेला शेतकरी अतिपावसामुळे आपला निर्णय चुकल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत आहे.तालुक्यत सोयाबीन पिकाचे ७० टक्के नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर उडीद व मुग याचे शंभर टक्के नुकसान आहे. तसेच कपाशी पिकाचा नुकसानीची माहिती घेण्यासंदर्भात कृषी सहायकांना सूचना दिल्या आहेत.-अंकुश जोगदंड , तालुका कृषी अधिकारी
यंदाही शेतकऱ्यांवर अस्मानी संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 05:00 IST
तालुक्यात पडणारा अतिपाऊस पिकांसाठी हानिकारक ठरत आहे. या पावसाने अल्पावधीतच हातात येणारे मूग व उडीद हे पिक पूर्णत: उध्वस्त केले असल्याची शेतकरी वर्गांमध्ये चर्चा आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीनवर सुद्धा विविध प्रकारच्या किडीने मोठ्या प्रमाणात आक्रमण केले आहे. पाने खाणाऱ्या अळीने पिकाची चाळणी केली आहे. तर सोयाबीन पिवळे पडू लागले आहे.
यंदाही शेतकऱ्यांवर अस्मानी संकट
ठळक मुद्देपावसामुळे पिकांचे लाखोचे नुकसान; सोयाबीनवर किड, मूग व उडीद गारद