शहरं
Join us  
Trending Stories
1
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
2
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
3
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
4
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
5
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
6
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
7
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
8
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
9
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
11
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
12
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
13
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
14
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
15
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
16
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
17
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
18
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
19
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
20
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा

चार फेसबुकधारकांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 06:00 IST

नॅशनल क्राईम ब्युरोमार्फत जिल्हास्तरावरील सायबर पोलीस ठाण्यांपर्यंत पोर्नेग्राफीच्या सात टिप्स लाईन मिळाल्या होत्या. त्यावरून शहर व ग्रामीण क्षेत्रातील सायबर पोलिसांनी तपासकार्य सुरू केले. संबंधित फेसबूकधारकांची पडताळणी केल्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर ठाण्यातील पोलिसांना तीन व्हिडीओत कुठल्याही प्रकारचे गुन्हेविषयक तत्थ आढळून आले नाही.

ठळक मुद्देसायबर पोलिसांची कारवाई : चाईल्ड पोर्नाेग्राफीचे दोन, वयस्कांचे दोन व्हिडीओ

वैभव बाबरेकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लहान मुलांसह वयस्कांचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या चार फेसबूक खातेधारकांविरुद्ध सायबर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. शहर पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलिसांनी बुधवारी एका फेसबूकधारकाविरुद्ध आयटी अ‍ॅक्टच्या कलम ६७ (ब) नुसार, तर ग्रामीण पोलीस दलातील सायबर पोलिसांनी २८ डिसेंबर २०१९ रोजीची तीन फेसबूकधारकांविरुद्ध आयटी अ‍ॅक्टच्या कलम ६७ (अ) नुसार गुन्हे नोंदविले आहेत. ‘लोकमत’ने बुधवारी 'हे काय? अमरावतीतही चाईल्ड पोर्नोग्राफी' या मथळ्याखाली सदर धक्कादायक प्रकार लोकदरबारात मांडला होता.नॅशनल क्राईम ब्युरोमार्फत जिल्हास्तरावरील सायबर पोलीस ठाण्यांपर्यंत पोर्नेग्राफीच्या सात टिप्स लाईन मिळाल्या होत्या. त्यावरून शहर व ग्रामीण क्षेत्रातील सायबर पोलिसांनी तपासकार्य सुरू केले. संबंधित फेसबूकधारकांची पडताळणी केल्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर ठाण्यातील पोलिसांना तीन व्हिडीओत कुठल्याही प्रकारचे गुन्हेविषयक तत्थ आढळून आले नाही. मात्र, अन्य तीन व्हिडीओत अश्लील कृत्य आढळून आले. या तीनपैकी दोन अश्लील व्हिडीओ हे वयस्क व्यक्तींचे होते, तर एका व्हिडीओत अल्पवयीन मुले होती. पडताळणीनंतर सायबर पोलिसांनी तिन्ही फेसबूकधारकांविरुद्ध गुन्हा नोंदविला. शहर सायबर पोलिसांना एका टिप्स लाईनवरून तपासकार्य सुरू केले असता, एका फेसबूकधारकाने लहान मुलांचा अश्लिल व्हिडीओ अपलोड केल्याचे उघड झाले. संबधीत फेसबुकधारकाविरुध्द शहर सायबर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.राज्यात १ हजार ६०० व्हिडीओ अपलोडदेशातील चाईल्ड पोर्नोग्राफी आणि १८ वर्षांवरील वयस्कांच्या अश्लील व्हिडीओसंबंधी फेसबूककडून नवी दिल्लीतील नॅशनल क्राइम ब्युरोला माहिती देण्यात आली होती. एनसीआरबीकडून ही माहिती राज्यस्तरीय सायबरला मिळाली. त्यानुसार राज्यात पोर्नोग्राफीचे तब्बल १ हजार ६०० व्हिडीओ फेसबूकवर अपलोड झाले. यामध्ये काही व्हिडीओ चाईल्ड पोर्नोग्राफीचे आहेत. या अश्लील व्हिडीओसंबंधी जिल्हास्तरावरील सायबर पोलीस यंत्रणा पडताळणी करीत आहे. व्हिडीओ अपलोड करणाºया संबंधित फेसबूकधारकांविरुद्ध गुन्हे दाखल केले जाणार आहेत. राज्यभरात ही कारवाई सुरू आहे.सीपी, एसपींचे जातीने लक्षचाईल्ड पोर्नोग्राफीविषयी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर आणि पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी जातीने लक्ष दिले आहे. त्यांनी सायबर पोलिसांना कारवाईसंदर्भात निर्देश दिले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात सायबर पोलीस गंभीरतेने आणि तत्परतेने तपास करीत आहेत.फेसबूक मेसेंजरचा वापरनवी दिल्लीतील नॅशनल क्राईम ब्युरोकडून टिप्स लाइन, सीडी व लिंक मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलने संबंधित फेसबूकधारकांची माहिती काढण्यास सुरुवात केली. यामध्ये फेसबूक मेसेंजरद्वारे अश्लील व्हिडीओ क्लिप पोस्ट केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार आयटी अ‍ॅक्टच्या कलम ६७ (अ) अन्वये गुन्हा नोंदविला. आता पुढील तपासानंतर या प्रकरणात आयटी अ‍ॅक्टची कलम ६७ (ब) दाखल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. 

टॅग्स :FacebookफेसबुकCrime Newsगुन्हेगारी