शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

रवी राणांविरुद्ध अमरावतीत गुन्हे दाखल; संचारबंदी, साथरोग कायद्याचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 21:40 IST

शासनाची परवानगी न घेता राजापेठ येथील उड्डाणपुलाचे उद्घाटन करणाऱ्या बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवि राणा यांच्याविरुद्ध शनिवारी राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आलेत.

ठळक मुद्देविनापरवानगी पुलाचे उद्घाटन, किराणा वाटपपोलीसच तक्रारकर्ते

 लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाची परवानगी न घेता राजापेठ येथील उड्डाणपुलाचे उद्घाटन करणाऱ्या बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवि राणा यांच्याविरुद्ध शनिवारी राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आलेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याचेही कलम त्यांच्याविरुद्ध लावण्यात आले आहे.आमदार रवि राणा यांनी शनिवारी सकाळी राजापेठ रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलाचे उद्घाटन केले. त्यासाठी काही ऑटोरिक्षा आणि १५ ते २० कार्यकर्ते त्यांनी जमविले. उद्घाटन केल्यावर तेथे एकत्रित झालेल्या गरजूंना धान्य व किराणा किटचे वाटप करण्यात आले. ही कृती विनापरवानगी उद्घाटन आणि नियमबाह्य लोक एकत्रित करणारी असल्याच्या कारणावरून गुन्हे दाखल करण्यात आले. राजापेठ पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक गजानन मेहेत्रे यांनी याप्रकरणी तक्रार नोंदविली. राणा यांच्यासह कार्यकर्ते व काही ऑटोरिक्षाचालकांवरही हे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. राजापेठचे पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भादंविचे कलम १८८, २६९, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ब, साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ चे कलम २, ३, ४, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ आणि महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक अधिनियम १९९५ चे कलम ३, ४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासंबंधी प्रतिक्रियेसाठी आमदार रवि राणा उपलब्ध होऊ शकले नाहीत.

टॅग्स :Ravi Ranaरवी राणाCrime Newsगुन्हेगारी