शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
5
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
6
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
7
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
8
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
9
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
10
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
11
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
12
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
13
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
14
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
15
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
16
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
17
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
18
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
19
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
20
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!

धामणगाव बाजार समितीच्या सभापती, संचालकांविरुद्ध गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 01:25 IST

सुमारे २ कोटी ९९ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी धामणगाव बाजार समितीच्या सभापती, संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांविरुद्ध दत्तापूर पोलिसांनी शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देसंडे अँकर । शेतकऱ्यांची योजना स्वत: लाटली; वारेमाप खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सुमारे २ कोटी ९९ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी धामणगाव बाजार समितीच्या सभापती, संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांविरुद्ध दत्तापूर पोलिसांनी शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. शेतमाल तारण कर्ज शेतकऱ्यांना न देता स्वत: वापरणे, प्रवास भत्ता अधिक उचलणे तसेच शेतकऱ्यांच्या भोजनालयावर अधिक खर्च दाखवून हा अपहार करण्यात आल्याचा आरोप आहे.धामणगाव रेल्वे येथील कृषिउत्पन्न बाजार समितीचे सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करण्यात आले. जिल्हा विशेष लेखापरीक्षक अशोक माकोडे यांनी त्या लेखापरीक्षणात अत्यंत गंभीर मुद्दे उजेडात आणले. संचालक मंडळाने काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून तब्बल २ कोटी ९९ लाख रुपयांची आर्थिक अफरातफर केल्याचा ठपका अशोक माकोडे यांनी ठेवला. आठवड्यापूर्वी त्यांनी दत्तापूर पोलीस ठाणे गाठून फौजदारी तक्रार नोंदविली.शेतमाल तारण कर्ज शेतकऱ्यांना देणे बंधनकारक असताना २ कोटी ८२ लाख रुपये संचालक मंडळ व इतर शेतकºयांच्या नावाने दाखवून तारण कर्जाची अफरातफर करण्यात आली. सभापतींनी १ लाख २४ हजार रुपये प्रवास भत्ता दाखवून त्यामध्ये गैरव्यवहार केल्याचे लेखापरीक्षण अहवालात स्पष्ट झाले आहे.शेतकऱ्यांसाठी असलेले भोजनालय अनधिकृतपणे चालवून त्यावर २ लाख १५ हजार रुपयांचा खर्च दाखवण्यात आला. यासंदर्भात जिल्हा विशेष लेखापरीक्षक अशोक माकोडे यांनी दत्तापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार दत्तापूर पोलिसांनी शनिवारी कृषिउत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती मोहन इंगळे, उपसभापती दुर्गाबक्षसिंह ठाकूर, सचिव प्रवीण वानखडे, लेखापाल प्रेमशंकर पांडे, कर्मचारी संजय तुपसुंदरे, संचालक रामदास निस्ताने, दिलीप लांबाडे, रवींद्र ठाकरे, नंदकिशोर ढोले, विजय गुल्हाने, स्नेहल जायले, प्रीती हांडे, श्रीकांत गावंडे, प्रशांत सबाने, मनोज कडू, निरंजन देशमुख, अविन टेकाडे, बबन मांडवगणे, रमेश राठी, सत्यनारायण लोया, विशाल पोळ या संचालकांविरुद्ध भादंविचे कलम ४२०, ४०८, ४०९, ४६८, ४६९, ४७१, ३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले.प्रकरणाचा पुढील तपास दत्तापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र सोनवणे यांच्याकडून होत आहे.ज्या योजनेसाठी पुरस्कार त्यातच गैरव्यवहारतारण योजनेच्या अंमलबजावणीसाठी दोन राज्यस्तरीय पुरस्कार मिळविणाºया धामणगाव बाजार समितीतच त्याच योजनेत कोटींचा भ्रष्टाचार करण्यात आला. भाजपशासित या बाजार समितीतील गैरव्यवहार प्रकरणी सहकार विभागाने जूनच्या पहिल्या आठवड्यात सभापती यांच्यासह २२ संचालकांना नोटीस बजावत १५ दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर फौजदारी गुन्हे दाखल झाल्याने सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. विशेष म्हणजे, तारण योजनेची काटेकोर अंमलबजावणी केली, या निकषांच्या आधारेच बाजार समितीला पुरस्कृत करण्यात आले होते.

टॅग्स :Marketबाजार