शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सत्यशोधक साहित्यातून सृजनशील जीवनदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 22:50 IST

राज्यातील बहुजनवादी विचारवंत, साहित्यिकांची मांदियाळी वरूडात जमली असून नव्या समाजाची दिशा कशी असावी, परिवर्तणवादी विचार समाजात कसा रुजवावा यावर विचारमंथन सुरू आहे.

ठळक मुद्देदुसरे सत्यशोधक साहित्य संमेलनाचे उद्घाटन : अनेक विचारवंतांची हजेरी

आॅनलाईन लोकमतवरूड : राज्यातील बहुजनवादी विचारवंत, साहित्यिकांची मांदियाळी वरूडात जमली असून नव्या समाजाची दिशा कशी असावी, परिवर्तणवादी विचार समाजात कसा रुजवावा यावर विचारमंथन सुरू आहे. या विचारप्ीाठाचे औचित्य आहे दुसऱ्या सत्यशोधक साहित्य संमेलनाचे. या समेलनाच्या उद्घाटनाला सत्यशोधक साहित्य जीवनदृष्टी देते, ही दृष्टी विध्वंसक नसून सृजनशिल आहे, असे मत विचारवंतांनी उद्घाटनप्रसंगी नोंदविले.सत्यशोधक फाउंडेशनच्यावतीने दुसरे सत्यशोधक साहित्य संमेलनाचे स्थानिक माधवराव काठीवाले सभागृहात नगराध्यक्ष स्वाती आंडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे होते. विचारपीठाचे स्वागताध्यक्ष मनोहर आंडे, अशोक बोडखे, बुलडाण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वºहाडे, उपविभागीय अधिकारी मनोहर कडू, जिल्हा परिचदेचे समाजकल्याण सभापती सुशीला कुकडे, विक्रम ठाकरे, अंजनगावचे तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, तहसीलदार आशिष बिजवल उपस्थित होते. फुले, शाहू, आंबेडकरी विचारांची देवाण-घेवाण करून बहुजन समाजाला नवी दिशा देणे गरजेचे असल्याचे मत या संमेलनात व्यक्त करण्यात आले.अध्यक्षस्थानावरून चंद्रकांत वानखडे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न उचलून धरत त्यांनी शासनावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, सत्यशाोधक साहित्य संमेलनामध्ये बदलत्या परिस्थीतीवर चर्चा करून संवाद घडावा. नवीन विषयाला स्वीकारताना स्वत:मध्ये काय बदल करावा, याचे आत्मपरीक्षण बहुजन समाजाने करणे गरजेचे आहे. जो समाज चिकित्सा करतो, आत्मपरीक्षण करतो तोच दोषमुक्त होऊ शकतो, असे मत त्यांनी मांडले.साहित्य संमेलनाच्या पहिल्या सत्रात मुंबई येथील सचिन परब, यवतमाळचे इतिहास संशोधक अशोक राणा यांनी विचार मांडले. दुसºया सत्रात अमरावतीचे डॉ. गणेश हलकारे व अनिसचे राज्य संघटक दिलीप सोळंके यांनी विचार मांडले. समारोपीय सत्राच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे, जगदीश काळे, प्रवीण चौधरी, विनय फरकाडे, दिलीप भोयर, किशोर भगत, महेंद्र भातकुले, नितीन खेरडे आदी उपस्थित होते.