लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जादूटोणाविरोधी कायद्याचे भय नसणाऱ्या पवन महाराजला अभय देऊन तपासात निष्काळजीपणा करणारे गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांची चौकशी होणार आहे. 'लोकमत'च्या वृत्ताची दखल घेत पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी ठाणेदार मनीष ठाकरेंच्या 'निग्लिजन्सी'ची तपासणी केली जाईल, अशी माहिती दिली.पवन महाराजने अनेक नागरिकांना अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढून फसवणूक केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४२० अन्वये गुन्हा नोंदविला जाणार आहे. भोंदूबाबाच्या घरातून पिशवी भरून साहित्य नेणाºया तरुण परित्यक्तेलाही गाडगेनगर पोलीस आरोपी करणार आहेत. तसे निर्देश पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी ठाणेदार मनीष ठाकरेंना दिले.नागरिक व अंनिसच्या तीन तक्रारींनंतर गाडगेनगर पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्याची अंमलबजावणीला सुरुवात केली. तत्पूर्वी पोलिसांनी अंधश्रद्धा पसरविणाऱ्या भोंदूबाबाला अटक का केली नाही, त्याच्या घराच्या झडती अर्धवट का केली, असे आदी प्रश्न गाडगेनगर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत.ठाणेदार ठाकरे दोन दिवसांच्या रजेवरपवन महाराजच्या भोंदूगिरीच्या प्रकरणात तपास अधिकारी तथा ठाणेदार मनीष ठाकरे यांची महत्त्वाची भूमिका आहे. पवन महाराज पोलिसांच्या हाती लागलेला नाही. ठाणेदार मनीष ठाकरे वैयक्तिक कामानिमित्त दोन दिवसांच्या रजेवर गेले आहेत. त्यामुळे आता पुढील दोन दिवस तरी पवन महाराजच्या प्रकरणातील तपासकार्य थंडबस्त्यात पडण्याची शक्यता आहे. ठाकरे यांचा चार्ज पोलीस निरीक्षक अनिल कुरुळकर यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती उपायुक्त चिन्मय पंडित यांनी दिली.
सीपी करणार ठाणेदाराची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 01:16 IST
जादूटोणाविरोधी कायद्याचे भय नसणाऱ्या पवन महाराजला अभय देऊन तपासात निष्काळजीपणा करणारे गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांची चौकशी होणार आहे.
सीपी करणार ठाणेदाराची चौकशी
ठळक मुद्देदखल : ‘त्या’ महिला भक्तालाही करणार आरोपी