शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

कोविशिल्डचा ठणठणाट, लसीकरणाची बोंबाबोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 5:00 AM

 दुसऱ्या लाटेच्या काळात लसीकरणासाठी पहाटे चारपासून केंद्रावर रांगा लागायच्या. काही केंद्रांवर पोलीस बंदोबस्तात लसीकरण झाल्याची उदाहरणे आहेत. जिल्ह्यातील नागरिकांचा लसीकरणाकडे असलेला कल पाहता केंद्रांची संख्या व त्यातुलनेत लसींचा पुरवठा होणे महत्वाचे असतांना तसे झालेले नाही. याचा फटका लसीकरण मोहिमेला बसला व सध्या २० ते २२ टक्केच लसीकरण झाले आहे.

ठळक मुद्देपुरवठ्यात सातत्य नाही, ७० टक्के केंद्र बंदच, नियोजनाअभावी मोहिमेची संथगती, नागरिक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात आतापर्यत सवार्धिक पुरवठा झालेल्या कोविशिल्ड लसींचा ठणठणाट असल्याने बुधवारी जिल्ह्यातील किमान ७० टक्के केंद्र बंद राहणार आहे. पुरवठ्यात सातत्य नसल्याने लसीकरणाचे केंद्र नेहमी बंद राहतात. कोणत्या केंद्रांवर कधी कोणती लस मिळेल याची माहिती नागरिकांना होत नसल्याचे त्यांना केंद्रावरुन नेहमीच परतण्याचे प्रसंग उद्भवत आहे. दुसऱ्या लाटेच्या काळात लसीकरणासाठी पहाटे चारपासून केंद्रावर रांगा लागायच्या. काही केंद्रांवर पोलीस बंदोबस्तात लसीकरण झाल्याची उदाहरणे आहेत. जिल्ह्यातील नागरिकांचा लसीकरणाकडे असलेला कल पाहता केंद्रांची संख्या व त्यातुलनेत लसींचा पुरवठा होणे महत्वाचे असतांना तसे झालेले नाही. याचा फटका लसीकरण मोहिमेला बसला व सध्या २० ते २२ टक्केच लसीकरण झाले आहे.कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये लसीकरण सर्वात महत्वाचे आहे. जिल्ह्यात  पहिली लाट सप्टेंबरमध्ये आल्यानंतर कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी लसीकरणाचे प्रयत्न सुरु झाले व जिल्ह्यात सर्वात जोखमीचे काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण १६ जानेवारीपासून करण्यात आले. त्यावेळी मोजकेच कर्मचारी असल्याने जिल्ह्यात सात केंद्रावर लसीकरण करण्यात आले व नंतर केंद्राची संख्या वाढविण्यात आली. मात्र, शासनाद्वारा नंतर फ्रंट लाईन वर्कर व अन्य चार टप्प्यातील लसीकरण सुरु झाल्यानंतर मात्र, ही यंत्रणा कोडमडली.जिल्ह्यात १८ वषार्वरील २२ लाख नागरिक आहेत. यामध्ये शहरात किमान सहा लाख लाभार्ती संख्या गृहीत घरुन केंद्र सुरु करणे व त्यातुलनेत लसींचा पुरवठा होणे महत्वाचे असतांना असे झालेले नाही, तीच गत ग्रामीणमध्ये झाली. एकूणच नियोजनाचे अभावामुळे लसीकरणाचे मोहिम ‘ब्रेक के बाद’ सुरु आहे. ग्रामीण भागात आजही कोरोनाची मोठी दहशत आहे. त्यामुळे बचावासाठी आपण लस घेतलीच पाहिजे, असा ग्रामीणांचा आग्रह आहे. मात्र लसीकरण सुरू झालेले नाही.

लसीकरणाची जिल्हास्थितीजिल्ह्यात आतापर्यत ६,०२,९७१ नागरिकांचे लसीकरण झालेले आहेत. यामध्ये फ्रंट लाईन वर्कर ५५,३४८, हेल्थ केअर वर्कर ३५,१९९, १८ ते ४४ वयोगट ५९,९९६, ४५ ते ५९ वयोगट २,१३,०९१ याशिवाय ६० वर्षावरील २,३८,५३९ ज्येष्ठ नागरिकांचे आतापर्यत लसीकरण करण्यात आले. यामध्ये कोविशिल्ड  ४,८६,१३० व कोव्हक्सिनची १,१६,८४१ नागरिकांना लस देण्यात आलेली आहे.

तरुणाईला ब्रेककेंद्र शासनाने १८ वर्षावरील प्रत्येक नागरिकांना ऑनलाईन नोंदणी शिवाय लस देण्याचे जाहिर केल्याने  केंद्रावर गर्दी होईल या शक्यतेने महिनाभर १८ ते २९ या वयोगटात लसीकरण थांबविण्यात आले होते. या दरम्यान ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. मात्र, आता पुन्हा तरुणाईचे लसीकरण सुरु झाले असता केंद्रांवर लसींचा ठणठणाट आहे.

सर्व काही पोर्टलचा घोळलसीकरणाच्या पोर्टलवर केंद्रांची नोंदणी आहे व या केंद्रांवर जो पर्यत लसीचा स्टॉक निरंक दाखवित नाही, तोपर्यत ते केंद्र सुरु दाखविते व लसीचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. याशिवाय जिल्ह्यास देखील कोणत्या केंद्रांवर कोणती लस शिल्लक आहे. हे माहिती पडत नसल्याने दुसऱ्या दिवशीचे नियोजन ऐनवेळी करण्यात येते.

अनलॉकच्या दुसऱ्या आदेशानुसार प्रतिष्ठानचे संचालक, दुकानदारांना लसीकरणाची सक्ती नाही. मात्र, कोरोनापासून सुरक्षितता म्हणून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. - नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी.

 जिल्ह्यात कोविशिल्डचा स्टाॅक संपल्याने ग्रामीणमधील २० ते २५ केंद्र बुधवारी सुरु राहतील, पुरवठ्यासंदर्भात अद्याप एसएमएस अप्राप्त आाहे. एक- दोन दिवसांत पुरवठा होईल. सध्या कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात येत आहे.  डॉ दिलीप रणमले जिल्हा आरोग्य अधिकारी

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस