शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यविधी आलेल्या भावंडांनी केली चुलत भावाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 16:52 IST

पुसदा पुनर्वसन येथील घटना

अमरावती : पुतणीच्या अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मद्यपी भावंडांनी चुलत भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री पुसदा पुनर्वसन परिसरात घडली. अनिल रामदास इंगोले (३२, रा. भुतेश्वरनगर, नागपूर) असे मृताचे नाव आहे. या हत्या प्रकरणात वलगाव पोलिसांनी गजानन विष्णुजी इंगोले आणि तुळशीदास विष्णुजी इंगोले (दोन्ही रा. नाईक तलाव, लालगंज पोलीस चौकीच्या मागे, नागपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. दोन्ही आरोपी पसार झाले असून, त्यांच्या शोधार्थ वलगाव पोलीस रवाना झाले आहे. 

पुसदा पुनर्वसन परिसरातील रहिवासी सुनील लक्ष्मणराव इंगोले (४१) यांची मुलगी काजल हिचे पोटाच्या आजारामुळे निधन झाले. तिच्या अंत्ययात्रेकरिता गुरुवारी सायंकाळी इंगोले कुटुंबातील सर्व नातेवाईक सुनील इंगोले यांच्या पुसदा पुनर्वसन येथील घरी आले होते. यामध्ये नागपूरहून आलेले अनील इंगोले, गजानन इंगोले आणि तुळशीराम इंगोले यांचासुद्धा समावेश होता. सायंकाळी काजलच्या पार्थिवावर अंत्यविधी झाल्यानंतर सर्व नातेवाईक स्मशानभूमीतून घरी पोहोचले.

दरम्यानच  अनिल इंगोले, गजानन इंगोले आणि तुळशीराम इंगोले शिराळा येथून मद्यप्राशन करून सुनील यांच्या घरी पोहोचले. रात्रीच्या १० वाजताच्या सुमारास तिघेही सुनील इंगोले यांच्या घराच्या अंगणात बसले होते. त्यावेळी गजानन आणि तुळशीराम यांनी काही कारणास्तव अनिल इंगोलेशी वाद घातला. त्यानंतर त्या दोघांनी बॅटने अनिलच्या  डोक्यावर व हातावर जबर मारहाण केली. या मारहाणीत अनिल गंभीर जखमी झाले. अंगणातील हा गोंधळ पाहून घरात जेवण करीत असलेले सुनिल बाहेर आले. त्यांनी जखमी अनिलला तत्काळ उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. शुक्रवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास अनिलचा मृत्यू झाला. घटनेच्या तक्रारीवरून वलगाव पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. घटनेनंतर दोन्ही आरोपी पसार झाले. त्यांच्या शोधात वलगाव पोलीस नागपूरला रवाना झाले.

टॅग्स :AmravatiअमरावतीMurderखूनDeathमृत्यू