शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

आसेगावातून बनावट खत जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST

मध्यप्रदेशातील देवास येथील बालाजी फॉस्पेट या कंपनीतून ते खत आणल्याची माहिती ट्रकचालक कैलास उजवारे (३५, रा. गुजरखेडी, जि. खंडवा) याने दिली. मात्र, त्याच्याकडे आवश्यक कागदपत्र नसल्याने तो ट्रक पोलीस ठाण्यात नेण्यात आला. तो ट्रक ज्ञानपुरी गोस्वामी (रा. सनावत, मध्यप्रदेश) यांच्या मालकीचा असल्याचे निष्पन्न झाले.

ठळक मुद्देपोलीस, कृषी विभागाची कारवाई : निकृष्ट खत विक्रीचा गोरखधंदा

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव पूर्णा : अमरावती परतवाडा महामार्गावरील आसेगावपूर्णा स्थित एका घरातून बनावट खताची पोती जप्त करण्यात आली. पोलीस व कृषी विभागाने रविवारी रात्री ही कारवाई केली. एमपी ०९/एचजी ६९६२ या क्रमांकाच्या ट्रकची झडती घेतल्यानंतर धाडीदरम्यान आसेगावातच बनावट खत निर्मितीचा प्रकार उघड झाला.मध्यप्रदेशातील देवास येथील बालाजी फॉस्पेट या कंपनीतून ते खत आणल्याची माहिती ट्रकचालक कैलास उजवारे (३५, रा. गुजरखेडी, जि. खंडवा) याने दिली. मात्र, त्याच्याकडे आवश्यक कागदपत्र नसल्याने तो ट्रक पोलीस ठाण्यात नेण्यात आला. तो ट्रक ज्ञानपुरी गोस्वामी (रा. सनावत, मध्यप्रदेश) यांच्या मालकीचा असल्याचे निष्पन्न झाले. त्या ट्रकमधून सुपर फॉस्पेट या खताची वाहतूक होत होती. दरम्यान ट्रकजप्तीनंतर आसेगाव पोलिसांनी लगेच गुणवत्ता नियंत्रण व निरीक्षक तथा कृषी अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानुसार गुणवत्ता नियंत्रण व निरीक्षक, कृषी अधिकारी व पोलिसांनी संयुक्तरीत्या येथील अमित ऊर्फ तुषार ढोरे यांच्या राहत्या घरी धाड टाकून चौकशी करण्यात आली. त्यांना तेथे हलक्या प्रतीचे सिंगल्स सुपर फॉस्पेट दाणेदार रासायनिक खत ईफको कंपनीच्या बॅगसारख्या छापलेल्या १०:२६:२६ या रासायनिक खताच्या बॅगमध्ये कमी दर्जाचे सुपर फॉस्पेट भरले जात असल्याची शक्यता वर्तविण्यात आली. ही बनावट बॅग २०० रुपये, तर १०:२६: २६ चे दर १३३५ रुपये प्रतिबॅग आहे. खर्च वजा जाता प्रतिबॅग एक हजार रुपये कमावण्याचा गोरखधंदा येथे सुरू असल्याचे विभागीय गणनियंत्रण व निरीक्षक अनंत मस्करे यांनी सांगितले.गुणनियंत्रण विभागाच्या चमूने उपलब्ध खतांचे नमुने घेतले. घटनास्थळाचा पंचनामा केला. घटनास्थळाहून सुपर फॉस्पेटच्या ४०० व १०:२६:२६ च्या रिकाम्या व भरलेल्या ३८६ थैल्या तसेच पोते शिवणारी मशीन जप्त केली.विभागीय गुण नियंत्रण व निरीक्षक विभागाचे अनंत मस्कर, कृषि विकास अधिकारी कुरबान तडवी, दादासो पवार, उईके, चांदूरबाजार पंचायत समितीचे कृषि अधिकारी नारायण आमझरे तालुका कृषी अधिकारी योगेंद्र संगेकर यांनी ही कारवाई केली. सदर प्रकरणात गुणवत्ता निरीक्षण व नियंत्रण व खत नियंत्रण आदेश १९८५ च्या कलम १९ अ, १९ क, २१, ८ व ९ आणि अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या कलम ३ तसेच भादंविच्या कलम ४२० नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास आसेगावपूर्णाचे ठाणेदार किशोर तावडे व त्यांचे सहकारी करीत आहेत.

टॅग्स :Policeपोलिस