जिल्हा परिषद : प्रशासकीय, विनंती बदल्यांचा समावेश लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्हा परिषदेतील वर्ग तीन आणि चार मधील बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या बदलीची प्रक्रिया १२ व १३ मे रोजी जिल्हा परिषदेत पार पडणार आहे. ही सर्व बदली प्रक्रिया समुपदेशनाव्दारे पार पडणार आहे. काही दिवसांपासून जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे वारे वेगाने वाहूृ लागले आहेत. त्यानुसार लांबणीवर पडलेली बदलीची प्रक्रिया आता वेग धरत आहे. प्रशासनाने नव्याने तयार केलेल्या नियोजनानुसार आता जिल्हा परिषदेतील वर्ग तीन आणि चार मधील बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाव्दारे प्रशासकीय व विनंती बदल्याची प्रक्रिया केली जाणार आहे. १२ मे रोजी पशुसंवर्धन विभाग, सिंचन, पाणी पुरवठाल बांधकाम कृषी या विभागातील तर शनिवार १३ मे रोजी वित्त, महिला व बालकल्याण, पंचायत, सामान्य प्रशासन, आरोग्य, प्राथमिक व माध्यमीक शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्या केल्या जाणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय सुत्रांनी सांगितले. आपसी बदल्याचे समायोजन १५ मे रोजी : बदली कालावधीत आपसी बदल्या मागणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या बरीच आहे.त्यामुळे आपसी बदल्यांची प्रक्रीया ही १५ मे रोजी सकाळी १० वाजता डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात पार पडणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे समुपदेशन शुक्रवारपासून
By admin | Updated: May 12, 2017 01:38 IST