वरुड : तालुक्यात कापूस उत्पादकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दरवर्षी हजारो क्विंटल कापसाचे उत्पादन घेतले जाते. परंतु दरवर्षीच्या दुष्काळी परिस्थीतीला सामोरे जाताना कपाशी लागवडीपासूनच शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले आहेत. पेरणीसाठी घेतलेले बियाणे, कीटकनाशकाच्या रक्कमेत दुकानदाराला कापूस द्यावा लागतो. यंदा कापसाला केवळ ३ हजार ७०० रुपये भाव मिळत असल्याने कापूस उत्पादकांची निराशा झाली.शेतकऱ्यांनी डोक्यावर कर्जाचा डोंगर असतानाही कुठेच न डगमगता नव्या जोमाने शेतीला सुरुवात केली. गत वर्षी कापसाला साडेचार ते पाच हजार रुपये क्विंटल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी यंदा कपाशीची लागवड केली. परंतु पावसाळा उशिरा सुरू झाल्याने पेरणीची प्रक्रिया लांबणीवर पडली. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी लावण्यात येणाऱ्या दिव्याच्या वातीला नवीन कापूस मिळाला नाही. आता कुठे कापसाच्या उत्पादनाला सुरुवात झाली. परंतु भाव घसरल्याने केवळ ३ हजार ७०० रुपयेपर्यंतच प्रति क्विंटलचे भाव मिळत आहे. यामुळे ेकापूस उत्पादकांना उत्पादन खर्च काढणे कठीण झाले आहे. राजकारण्यांच्या फसव्या आश्वानाचे बळी शेतकरी ठरत आहे. १२ हजार हेंक्टर पेक्षा अधिक क्षेत्रात कपाशीची लगावड आहे. परंतु सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने उशिरा लागवड झाली. काहीसा पाऊस पडल्याने पुन्हा दडी मारली. पिकाला पाणी देऊन शेतकऱ्यांना ओलीत करावे लागत आहे. यातच कीटकनाशके, खते महागल्याने शेतकऱ्यांना कर्जाऊ रक्कम घेऊन मशागती करावी लागते. काही दुकानदार कापूस, सोयाबीनचे व्यापारी असल्याने पेरणीच्यावेळी बिया बियाणे, खते, कीटकनाशके घेताना हजारो रुपयांसाठी कापूस सोयाबीन दुकानदारांनाच देण्याची प्रथा ग्रामीण भागात आहे. परंतु यावर्षी भाव नसल्याने कापूस, सोयाबीन उत्पादकांना लाखो रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)
कापसाला कवडीमोल भाव; शेतकरी हताश
By admin | Updated: October 27, 2014 22:29 IST