शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीपूर्वी पांढरे सोने शेतकऱ्यांच्या घरात, कापूस वेचणीपूर्वीच्या सीतदहीला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2021 13:42 IST

कापूस वेचणीला प्रारंभ करण्यापूर्वी बळीराजाकडून शेतात सीतादही उरकविण्याचे काम सुरू करण्यात आले.

अमरावती : दिवाळीच्या मुहूर्तावर घरी येणारा कापूस निसर्गाच्या अवकृपेने उशिरा का होईना शेतात दिसू लागला आहे. विदर्भातील शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेले कापूस पीक घरी आणण्याकरिता शेतकऱ्यांची तयारी सुरू झाली आहे.

कापूस वेचणीला प्रारंभ करण्यापूर्वी बळीराजाकडून शेतात सीतादही उरकविण्याचे काम सुरू करण्यात आले. कुणी कपाशीच्या शेतात झुला बांधून पूजा करून प्रसादाचे वाटप करतात. त्यानंतर कापूस काढण्यासाठी प्रारंभ करतात. पूर्व विदर्भात वेगवेगळ्या जिल्ह्यांत वेगवेगळ्या पूजेने कापूस वेचण्याचे काम सुरू झाले आहे. परंतु अवकाळी पावसामुळे कापसाच्याही उत्पादनात घट येणार आहे.

जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतातील कपारीची बोंड गळून पडली. पावसामुळे ओले झालेली बोंड सडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कपाशीचा भरघोस उत्पादनाची आशा मावळली आहे. यात काही शेतात कपाशीची बोंडे आता फुटू लागली आहेत. कापूस वेचण्याचे काम शेतकऱ्यांकडून सुरू झाले आहे. विदर्भात प्रमुख उत्पादन म्हणून कापसाकडे पाहिले जाते. कधी सोयाबीनच्या कमी-अधिक उत्पन्नामुळे कापसाचे क्षेत्र बदलत आले आहे.

गतवर्षी मिळालेल्या वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांकडून कापसाचे क्षेत्र कायम ठेवण्यात आले आहे. प्रारंभी विलंबाने आलेल्या पावसामुळे कपाशीची लागवड उशिराने झाली. कापूस निघण्याच्या काळात आलेल्या परतीच्या पावसाने शेतात उभी असलेली पहाटी झोडपून काढली. या सर्व परिस्थितीत शेतात असलेला कापूस वेचण्याचे काम शेतकऱ्यांकडून सुरू झाले आहे. कापूस काढणीला प्रत्यक्षात प्रारंभ करण्यापूर्वी परंपरेनुसार शेतकऱ्यांकडून शेतात सीतादही करण्यात येते. सध्या कापसाच्या शेतात बळीराजा या कामात व्यस्त असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कापसाच्या शेतात वेगवेगळ्या प्रकारची पूजापाठ कापूस वेचण्यापूर्वीच सुरू झाली आहे.

टॅग्स :cottonकापूसagricultureशेतीFarmerशेतकरी