शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतीशाळांच्या किट खरेदीत १.२० कोटीचा भ्रष्टाचार : आ. सुरेश धस यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 12:49 IST

Amravati : कृषी आयुक्तांकडे तक्रार, जेडीए लहाळे अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कृषी विभागातील काही चर्चित अधिकाऱ्यांविरोधात आ. सुरेश धस चांगलेच आक्रमक झाले आहेत. यामध्ये अमरावतीचे विभागीय कृषी सहसंचालक (जेडीए) प्रमोद लहाळे यांच्या काही प्रकरणांची पुराव्यासह तक्रार १८ जूनला कृषी आयुक्तांकडे त्यांनी केली. यामध्ये शेतीशाळांच्या किट खरेदीत १.२० कोटीचा भ्रष्टाचार लहाळे यांनी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

लहाळे यांच्या अनियमिततेच्या तीन तक्रारी आ. धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रधान सचिव (कृषी) विकासचंद रस्तोगी व कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडे केल्या आहेत. या सर्व प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. लहाळे यवतमाळ येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी असताना जिल्ह्यातील शेतीशाळांचे किट खरेदीसाठी शासननियम डावलून ऑर्डर दिली. पुरवठादाराने किटमधील एकाही वस्तूचा पुरवठा न करता लहाळे यांना बिले दिले व पुरवठादारास २०२५ मध्ये ५० लाख, सन २०२४ मध्ये ७७ लाख रुपयांचे किट कागदावर खरेदी दाखवून १.२० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आ. धस यांनी तक्रारीत केला आहे.

मला माहिती पुरवित असल्याच्या संशयावरून काही अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे प्रस्ताव, विभागीय चौकशीचे प्रस्ताव शुल्लक कारणास्तव मंत्रालयात सादर करीत असल्याचा घणाघात आ. धस यांनी तक्रारीत केला. याबाबत जेडीए प्रमोद लहाळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आरोप नाकारले व याबाबत अधिक बोलण्यास नकार दिला. 

कृषी सहायक, पर्यवेक्षकांच्या बदल्यात भ्रष्टाचार

  • अमरावती जेडीए कार्यालयात स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी प्रशांत नाईक यांना अधीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला, व त्यांच्या माध्यमातून कृषी सहायकाचे बदलीसाठी १ लाख व कृषी पर्यवेक्षकासाठी २ लाख रुपये गोळा करण्यात आल्याचा आरोप आ. धस यांनी तक्रारीत केला आहे.
  • यवतमाळ जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानात २२ कोटींचा भ्रष्टाचार झाला., त्यामध्ये नाईक यांच्यावर ३.५० कोटींची वसुली काढण्यात आली. लहाळे यांनी तत्कालीन कृषिमंत्री यांना चुकीची माहिती देऊन नाईक यांची पदोन्नती एसएओ पदावर केल्याचा आरोप तक्रारीत आहे. नाईक यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहे.

"अमरावती जेडीए प्रमोद लहाळे यांच्यासंदर्भात मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून एसआयटी स्थापन करण्यासाठी निवेदन दिले आहे. चर्चा सकारात्मक झाली."- सुरेश धस, आमदार

टॅग्स :Suresh Dhasसुरेश धसAmravatiअमरावतीfarmingशेती