शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : धामणगावातील 'त्या' पहिल्या कोरोनाबाधित युवतीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 16:39 IST

धामणगाव शहरातील धवणेवाडी आंबेडकरनगर येथील २१ वर्षीय युवतीला तापाची लक्षणे आढळल्याने प्रथम अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

धामणगाव रेल्वे (अमरावती) : शहरातील पहिली कोरोनाबाधित असलेल्या युवतीने कोरोनाला हरवले. मात्र मेंदूज्वर या दुर्धर आजाराने तिचा मंगळवारी पहाटे सावंगी मेघे रुग्णालयात मृत्यू तिचा झाला. धामणगाव शहरातील धवणेवाडी आंबेडकरनगर येथील २१ वर्षीय युवतीला तापाची लक्षणे आढळल्याने प्रथम अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने १७ मे रोजी सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दाखल केले होते.तिचा थ्रोट स्वॅब घेतला असता, १८ मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह आला, तर तिच्यासोबत असलेल्या आई व दोन बहिणी यांची तपासणी करण्यात आली.  १९ मे रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. चौदा दिवसांनंतर परत चारही रुग्णांचा  दुसरा  थ्रोट स्वॅब  तपासणीला पाठविला असता चार दिवसांपूर्वी तो निगेटिव्ह आला होता. मात्र त्या पहिल्या युवतीची पूर्वीपासून  मेंदूज्वराच्या आजाराशी झुंज सुरू होती.तिला या आजारातून बाहेर काढण्यासाठी सावंगी मेघे रुग्णालयातील टाक्स फोर्समधील वैद्यकीय चमूने अथक परिश्रम घेतले. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना  यश आले नाही. अखेर मंगळवारी पहाटे  ४.१५ वाजता सदर युवतीचा  रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती वर्धा येथील जिल्हा शल्यचिकित्सक पुरूषोत्तम  मडावी यांनी दिली. सदर युवतीच्या पार्थिवावर वर्धा येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे मडावी म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस