आरोग्य कर्मचाऱ्यांना अचलपूरमध्ये शनिवारला कोरोनालस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:16 AM2021-01-16T04:16:36+5:302021-01-16T04:16:36+5:30

ज्यांनी आधी नोंदणी केली आहे त्यांना कोरोना लस देण्यापूर्वी त्यांचे ऑनलाइन व्हेरिफिकेशन केले जाईल. अशांना ओटीपीसुद्धा मिळेल. ओळख पटल्यानंतर ...

Coronals to health workers in Achalpur on Saturday | आरोग्य कर्मचाऱ्यांना अचलपूरमध्ये शनिवारला कोरोनालस

आरोग्य कर्मचाऱ्यांना अचलपूरमध्ये शनिवारला कोरोनालस

Next

ज्यांनी आधी नोंदणी केली आहे त्यांना कोरोना लस देण्यापूर्वी त्यांचे ऑनलाइन व्हेरिफिकेशन केले जाईल. अशांना ओटीपीसुद्धा मिळेल. ओळख पटल्यानंतर निश्चित अशा त्याच नोंदणीकृत आरोग्य कर्मचाऱ्याला ही लस दिली जाईल.

अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात या लसीकरणाकरिता एक पथक निश्चित करण्यात आले आहे. संबंधितांना ही कोरोना लस दिल्यानंतर त्यांना एक-अर्धा तास दवाखान्यात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले जाणार आहे.

शनिवारी दिल्या जाणाऱ्या कोरोना लसीकरणाच्या अनुषंगाने बुधवार, १३ जानेवारीला जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. श्यामसुंदर निकल यांनी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन येथील व्यवस्थेची पाहणी केली. या वेळी संबंधित यंत्रणेला आवश्यक सूचनाही त्यांनी दिल्या.

कोट

शनिवार, १६ जानेवारीला अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात शंभर आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. ज्यांनी आधी नोंदणी केली आहे अशांनाच ही लस दिली जाणार आहे. लस देण्यापूर्वी संबंधिताचे ऑनलाइन व्हेरिफिकेशन केले जाणार आहे.

- डॉ. एस.डी. ढोले, अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय - अचलपूर

Web Title: Coronals to health workers in Achalpur on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.