शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीला कोरोनाचा हादरा, एकाच दिवसात आणखी १९ पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 19:43 IST

कोरोनाग्रस्तांची संख्या १३४ : ग्रामीणमध्येही संक्रमित निष्पन्न

अमरावती : विद्यापीठाच्या लॅबद्वारा बुधवारी दुपारी आलेल्या १९ पॉझिटिव्ह अहवालाने शहराला हादरा बसला आहे.  एवढ्या मोठ्या संख्येने संक्रमित रुग्णांचे अहवाल प्राप्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १३४ झालेली आहे. याव्यतिरिक्त धामणगाव तालुक्यातील तीन रुग्णांचे अहवाल वर्धा जिल्ह्यात व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहगाव येथील सात वर्षीय बालकाचा अहवाल मध्यप्रदेशातील इंदूर येथे पॉझिटिव्ह आलेला आहे.

बुधवारी प्राप्त अहवालानुसार, येथील नवे हॉटस्पॉट असलेल्या मसानगंज येथे आणखी सात व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या कंटेनमेंटमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या २० झालेली आहे. या व्यतिरिक्त शिवनगर येथे दोन, पाटीपुरा येथे दोन, सिंधूनगर, रहमतनगर, बेलपुरा, पॅराडाईज कॉलनी, चेतनदास बगिचा, प्रबृद्ध विहार, पार्वतीनगर व नांदगाव पेठ येथे प्रत्येकी एक कोरोना संक्रमितांची नोंद झालेली आहे.बुधवारी प्रबुद्ध विहार, बेलपुरा, शिवनगर, बजरंग टेकडी (मसानगंज परिसर) या चार नव्या भागांत कोरोनाग्रस्तांची नोंद झाल्याने महापालिका आयुक्तांद्वारा हे चार नवे प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसamravati-acअमरावतीcorona virusकोरोना वायरस बातम्या