शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

कोरोनाचा हादरा, पुन्हा १२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 5:00 AM

जिल्ह्यात पहिल्यांदा पाच वर्षांची चिमुुरडी बाधित आढळली. यासह सात महिला व पाच पुरुषांचा संक्रमितांमध्ये समावेश आहे. रविवारी पुन्हा शहराला कोरोनाने हादरा दिला. येथील हबीबनगर कंटेनमेंटमधील ३१ वर्षीय व्यक्ती २१ मे रोजी कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना क्वारंटाइन करून थ्रोट स्वॅब तपासणीला पाठविला होता. त्याचा अहवाल रविवारी सकाळी पॉझिटिव्ह प्राप्त झाला.

ठळक मुद्देएकूण १६४ : पाच वर्षांची चिमुरडी संक्रमित, हबीबनगरही बनले हॉटस्पॉट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मसानगंजनंतर हबीबनगरही आता कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनला आहे. अमरावती विद्यापीठाकडून रविवारी दुपारपर्यंत प्राप्त दोन टप्प्यात १२ अहवाल पॉझिटिव्ह आलेत. यामध्ये हबीबनगरात एका परिवारातील सदस्यांसह त्यांच्या संपर्कातील आठ संक्रमित आढळून आल्याने हा परिसर आता कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनला आहे. या व्यतिरिक्त मसानगंज हॉटस्पॉटमध्ये रविवारी पुन्हा १९ वर्षीय युवकाची नोंद झाली. दिवसभरात निष्पन्न झालेले सर्व पॉझिटिव्ह यापूर्वी जाहीर केलेल्या कंटेनमेंटमधील आहे.जिल्ह्यात पहिल्यांदा पाच वर्षांची चिमुुरडी बाधित आढळली. यासह सात महिला व पाच पुरुषांचा संक्रमितांमध्ये समावेश आहे. रविवारी पुन्हा शहराला कोरोनाने हादरा दिला. येथील हबीबनगर कंटेनमेंटमधील ३१ वर्षीय व्यक्ती २१ मे रोजी कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना क्वारंटाइन करून थ्रोट स्वॅब तपासणीला पाठविला होता. त्याचा अहवाल रविवारी सकाळी पॉझिटिव्ह प्राप्त झाला. यामध्ये पाच वर्षीय चिमुकली, ३० व ६५ वर्षीय महिला व ३३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. या व्यतिरिक्त या परिवाराच्या संपर्कातील २२ व ५४ वर्षीय पुरुष व ३६ वर्षांच्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. याव्यतिरिक्त २१ मे रोजी पॉझिटिव्ह अलहिलाल कॉलनीतील एका व्यक्तीच्या संपर्कातील ११ वर्षीय मुलगी तसेच शिवनगरात २१ व २२ मे रोजी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील शिवनगरातील ३० वर्षीय युवक व ६५ वर्षीय वृद्धाचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला. या सर्वांना कोविड रुग्णालयातील दुसऱ्या माळ्यावरील कक्षात हलविले आहे.कोविड रुग्णालयातील ४५ वर्षीय परिचारिकेचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोविड रुग्णालयात १० दिवसांची सेवा आटोपल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात येते. या महिलेचा थ्रोट स्वॅब तपासणीला पाठविला होता. याचा अहवाल रविवारी सकाळी प्राप्त झाल्याने कोविड रुग्णालयातील चौथा वॉरिअर संक्रमित झाला आहे.आरोग्य विभागाद्वारे या संक्रमित रुग्णांची हिस्ट्री घेण्याचे काम सुरू आहे. बाधिताच्या घराकडील मार्ग बंद करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या भागात सॅनिटायझरची फवारणी करण्यात येणार आहे. हबीबनगर परिसर यापूर्वीच कंटेनमेट जाहीर केला असल्याने आशा व एएनएम व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पथकाद्वारे गृहभेटी देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांद्वारा पाहणीजिल्हाधिकारी शैलेश नवाल व महानगरपालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी रविवारी दुपारी वलगाव मार्गावरील रॉयल पॅलेस व इंजिनीअरिंंग कॉलेज येथील क्वारंटाईन कक्षाची पाहणी केली. येथे हायरिस्कच्या व्यक्तींना ठेवण्यात आले असून, महापालिकेच्या आरोग्य पथकाची तेथे नेमणूक करण्यात आली आहे. या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केली. त्यानंतर तारखेडा येथील दवाखान्याला भेट देऊन ही इमारत वापरात आणण्याची सुचना त्यांनी केली व उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.कोविड रुग्णालयातील चौथा वॉरिअर संक्रमितशासकीय संदर्भ सेवा रुग्णालयात उभारलेल्या कोविड रुग्णालयातील चार कोरोना वॉरिअर आतापर्यंत संक्रमित झाले आहेत. यापूर्वी कोविड रुग्णालयात कार्यरत अंबिकानगर व बेलपुरा येथील दोन सफाई कामगार, शनिवारी अकोल्याच्या अनंतनगरातील रहिवासी असलेला कम्युनिटी हेल्थ ऑफिसर आणि रविवारी याच रुग्णालयाची महिला परिचारिका कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. या चौघांव्यतिरिक्त जिल्ह्यात आतापर्यंत ११ कोरोना वॉरिअर्स संक्रमित झाले आहेत. कोविड रुग्णालय सुरू झाल्यानंतर सध्या ८० कर्मचाऱ्यांचे चौथे पथक कर्तव्यावर आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या