शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

तब्बल ४० दिवसानंतर वरूड तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 5:00 AM

वरूड तालुक्यात सुरुवातीच्या काळात शासकीय वाहनचालकाची पत्नी, दोन मुली आणि शेजारील महिला कोरोना पॉझिटिव्ह आली होती. जरूडच्या जावयाने तालुका हादरून सोडला होता. यानंतर एक एसटी बसचालक दाम्पत्य पॉझिटिव्ह आले. हे सर्व रुग्ण बरे होऊन घरी परतल्यानंतर आता तब्बल ४० दिवसानंतर राजुरा बाजार येथील २७ वर्षीय तरुणी आणि ४८ वर्षीय महिलेचा थ्रोट स्वॅब तपासणी अहवाल १३ जुलै रोजी पॉझिटिव्ह आला आहे.

ठळक मुद्देराजुरा बाजार येथे दोन संक्रमित : प्रशासनाने केले दक्ष राहण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड/राजुराबाजार : तालुक्यातील राजुरा बाजार येथील दोन महिलांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुका प्रशासनाने तब्बल ४० दिवस शांततेत घालवणाऱ्या वरूडवासीयांना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे.वरूड तालुक्यात सुरुवातीच्या काळात शासकीय वाहनचालकाची पत्नी, दोन मुली आणि शेजारील महिला कोरोना पॉझिटिव्ह आली होती. जरूडच्या जावयाने तालुका हादरून सोडला होता. यानंतर एक एसटी बसचालक दाम्पत्य पॉझिटिव्ह आले. हे सर्व रुग्ण बरे होऊन घरी परतल्यानंतर आता तब्बल ४० दिवसानंतर राजुरा बाजार येथील २७ वर्षीय तरुणी आणि ४८ वर्षीय महिलेचा थ्रोट स्वॅब तपासणी अहवाल १३ जुलै रोजी पॉझिटिव्ह आला आहे. यातील तरुणी ही तिच्या मैत्रिणीला भेटण्याकरिता ब्राम्हणवाडा थडी (ता. चांदूर बाजार) येथे गेली होती . तिच्या कोरोना पॉझिटिव्ह मैत्रिणीकडून या तरुणीला संसर्ग झाला. राजूराबाजार येथील ही तरुणी सीएचओ आहे, तर ४८ वर्षीय महिला आरोग्य सहायक आहे. कार्यक्षेत्रात सोबत असल्याने दोघींचेही चार दिवसांपूर्वी त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते.अहवाल येताच एसडीओेंच्या निर्देशाने राजुरा बाजार कंटेनमेंट झोन घोषित करण्यातआले. तहसीलदार सुनिल सावंत, ठाणेदार मगन मेहते, गटविकास अधिकारी वासुदेव कनाटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमोल देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार राजुºयात तळ ठोकून असून, कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील व्यक्तींची यादी तयार करणे सुरू आहे.राजुऱ्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये बाहेरगावाहून येणारे अधिकारी, कर्मचारी आहेत. त्यांच्यासह व्यापाऱ्यांवर बंदी आवश्यक आहे.- डॉ. अमोल देशमुख, तालुका आरोग्य अधिकारीराजुऱ्यात दोन कोरोनाग्रस्त आढळले. कर्मचाऱ्यांना अनेकदा सूचना दिल्या तरीही ये-जा सुरूच आहे. संस्थाप्रमुखांना पुन्हा लेखी पत्र देऊन कारवाईच्या सूचना केल्या आहेत. तसे न झाल्यास संस्थाप्रमुखांवर कारवाई होईल.- सुनील सावंत, तहसीलदार

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या