तब्बल ४० दिवसानंतर वरूड तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 05:00 AM2020-07-14T05:00:00+5:302020-07-14T05:00:12+5:30

वरूड तालुक्यात सुरुवातीच्या काळात शासकीय वाहनचालकाची पत्नी, दोन मुली आणि शेजारील महिला कोरोना पॉझिटिव्ह आली होती. जरूडच्या जावयाने तालुका हादरून सोडला होता. यानंतर एक एसटी बसचालक दाम्पत्य पॉझिटिव्ह आले. हे सर्व रुग्ण बरे होऊन घरी परतल्यानंतर आता तब्बल ४० दिवसानंतर राजुरा बाजार येथील २७ वर्षीय तरुणी आणि ४८ वर्षीय महिलेचा थ्रोट स्वॅब तपासणी अहवाल १३ जुलै रोजी पॉझिटिव्ह आला आहे.

Corona positive in Warud taluka after 40 days | तब्बल ४० दिवसानंतर वरूड तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह

तब्बल ४० दिवसानंतर वरूड तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देराजुरा बाजार येथे दोन संक्रमित : प्रशासनाने केले दक्ष राहण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड/राजुराबाजार : तालुक्यातील राजुरा बाजार येथील दोन महिलांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुका प्रशासनाने तब्बल ४० दिवस शांततेत घालवणाऱ्या वरूडवासीयांना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे.
वरूड तालुक्यात सुरुवातीच्या काळात शासकीय वाहनचालकाची पत्नी, दोन मुली आणि शेजारील महिला कोरोना पॉझिटिव्ह आली होती. जरूडच्या जावयाने तालुका हादरून सोडला होता. यानंतर एक एसटी बसचालक दाम्पत्य पॉझिटिव्ह आले. हे सर्व रुग्ण बरे होऊन घरी परतल्यानंतर आता तब्बल ४० दिवसानंतर राजुरा बाजार येथील २७ वर्षीय तरुणी आणि ४८ वर्षीय महिलेचा थ्रोट स्वॅब तपासणी अहवाल १३ जुलै रोजी पॉझिटिव्ह आला आहे. यातील तरुणी ही तिच्या मैत्रिणीला भेटण्याकरिता ब्राम्हणवाडा थडी (ता. चांदूर बाजार) येथे गेली होती . तिच्या कोरोना पॉझिटिव्ह मैत्रिणीकडून या तरुणीला संसर्ग झाला. राजूराबाजार येथील ही तरुणी सीएचओ आहे, तर ४८ वर्षीय महिला आरोग्य सहायक आहे. कार्यक्षेत्रात सोबत असल्याने दोघींचेही चार दिवसांपूर्वी त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते.
अहवाल येताच एसडीओेंच्या निर्देशाने राजुरा बाजार कंटेनमेंट झोन घोषित करण्यातआले. तहसीलदार सुनिल सावंत, ठाणेदार मगन मेहते, गटविकास अधिकारी वासुदेव कनाटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमोल देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार राजुºयात तळ ठोकून असून, कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील व्यक्तींची यादी तयार करणे सुरू आहे.

राजुऱ्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये बाहेरगावाहून येणारे अधिकारी, कर्मचारी आहेत. त्यांच्यासह व्यापाऱ्यांवर बंदी आवश्यक आहे.
- डॉ. अमोल देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी


राजुऱ्यात दोन कोरोनाग्रस्त आढळले. कर्मचाऱ्यांना अनेकदा सूचना दिल्या तरीही ये-जा सुरूच आहे. संस्थाप्रमुखांना पुन्हा लेखी पत्र देऊन कारवाईच्या सूचना केल्या आहेत. तसे न झाल्यास संस्थाप्रमुखांवर कारवाई होईल.
- सुनील सावंत, तहसीलदार

Web Title: Corona positive in Warud taluka after 40 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.