शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Amravati; मेळघाटच्या सीमेवर आढळला कोरोना पॉझिटिव्ह; सर्वत्र खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 21:35 IST

मेळघाटच्या सीमारेषेवरील मध्यप्रदेशच्या बैतूल तालुक्यातील भैसदेही येथील एक इसम कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. भोपाळ येथील वैद्यकीय प्रयोगशाळेतून सोमवारी दुपारी तो अहवाल बैतूल आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाला.

ठळक मुद्देमहाराष्ट्र-मध्यप्रदेश बॉर्डर सीलप्रशासन अलर्ट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाटच्या सीमारेषेवरील मध्यप्रदेशच्या बैतूल तालुक्यातील भैसदेही येथील एक इसम कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. भोपाळ येथील वैद्यकीय प्रयोगशाळेतून सोमवारी दुपारी तो अहवाल बैतूल आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाला. त्यानंतर मध्यप्रदेश प्रशासनाने भैसदेही येथील ती व्यक्ती राहत असलेला संपूर्ण परिसर सील केला आहे. भैसदेही शहर मेळघाटातील अनेक आदिवासी खेड्यांना लागून असल्याने स्थानिक परिसरात खळबळ उडाली आहे.तालुक्यातील काटकुंभ, चुरणी, जारिदा परिसरातील २५ पेक्षा अधिक आदिवासी पाड्यातील नागरिक दैनंदिन गरजेसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदीकरिता भैसदेही येथे जातात. संपूर्ण भारतभर 'लॉकडाऊन' झाल्यावर या परिसरातील पालेभाजी विक्रेता व किराणा व्यावसायिक या भागात ये-जा करतात. विशिष्ट समुदायातील नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने मेळघाटातील या भागात दहशत पसरली आहे.नागपूर येथून आला होता युवकतो युवक काही दिवसांपूर्वी नागपूरहून भैसदेही येथे परतला होता. त्याचा कोरोनाबाबतचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यादृष्टीने परिसरात कर्फ्यू लावण्यात आला. परिसर पूर्णत: सील करण्यात आल्याचे बैतूलचे जिल्हाधिकारी राकेश सिंग यांनी 'लोकमत'ला सांगितले.जिल्ह्यातील एका युवकाचा अहवाल कोविड-१९ पॉझिटिव्ह आला आहे. तो युवक भैसदेही येथील आहे. संपूर्ण परिसर सील करून सॅनिटाईज्ड केला जात आहे.- गिरीश चौरसिया,जिल्हा आरोग्य अधिकारी, बैतूल

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस