कोरोनाने १० जणांचा बळी, ६९९ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 05:00 AM2021-03-02T05:00:00+5:302021-03-02T05:00:57+5:30

जिल्हा प्रशासनाने ८ मार्चपर्यत अमरावती महापालिका व अचलपूर नगरपालिका हद्दीत ‘लॉकडाऊन’ घोषित केले. कठोर निर्बंध लागू केेले. तरीही बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या नावे गर्दी कायम आहे. नियमावलींचे पालन होण्यासाठी महापालिका, जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा कार्यवाही करीत असली तरी अमरावती शहर, अंजनगाव सुर्जी, अचलपूर शहरात कोरोना संक्रमितांची संख्या वाढतच आहे.

Corona kills 10, 699 positive | कोरोनाने १० जणांचा बळी, ६९९ पॉझिटिव्ह

कोरोनाने १० जणांचा बळी, ६९९ पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देमृत्युसंख्या ५२१, बाधितांचा आकडा पोहोचला ३५,८१६ वर, चिंतेत भर

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नवीन वर्षात कोरोना संक्रमणाचा वेग वाढत असतानाच  मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी कोरोनाने दगावलेल्यांचा आकडा दुहेरी संख्येत आला. १० जणांचा बळी कोरोनाने घेतला असून, ६९९ संक्रमित आढळून आले. ‘लॉकडाऊन’मध्येसुद्धा कोरोनाग्रस्त व मृत्युसंख्या कमी होण्याचे चिन्हे दिसून येत नाही.
जिल्हा प्रशासनाने ८ मार्चपर्यत अमरावती महापालिका व अचलपूर नगरपालिका हद्दीत ‘लॉकडाऊन’ घोषित केले. कठोर निर्बंध लागू केेले. तरीही बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या नावे गर्दी कायम आहे. नियमावलींचे पालन होण्यासाठी महापालिका, जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा कार्यवाही करीत असली तरी अमरावती शहर, अंजनगाव सुर्जी, अचलपूर शहरात कोरोना संक्रमितांची संख्या वाढतच आहे. समूह संसर्गाचा धाेका बळावला असतानाही नागरिक बेफिकीर आहेत. त्यामुळे ‘लॉकडाऊन’मध्ये कोरोना पॉझिटिव्ह अधिक आढळून येत आहे. 
सोमवारी ६९९ कोरोना संक्रमित आढळून आले असून, आतापर्यंत ३५ हजार ८१६ एवढी नोंद करण्यात आली आहे. १० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृत्युसंख्या  ५३१ झाली आहे. गृह विलगीकरणात महापालिका क्षेत्रात ३३४३, तर ग्रामीण भागात ९७६ रुग्ण उपचार घेत आहे. दाखल संक्रमित १४४५ एवढे,  तर ॲक्टिव्ह रुग्णाची संख्या ५७६४ आहे. रुग्णांचा रिकव्हरी रेट  ८२.४५ टक्के असून, डबलिंग रेट १०५ दिवसांवर आला आहे. मृत्युदर १.४५ टक्के आहे. एकूण नमुने २ लाख  २७ हजार ४६१ तपासणी करण्यात आले आहेत.

कोरोनाचे मृत्यू १० की १७?
जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या माहितीनुसार, कोरोनाने सोमवारी १० रुग्णांचा बळी घेतला. मात्र, येथील हिंंदू स्मशानभूमीत रात्री ८ पर्यंत कोरोनाचे बळी ठरलेल्या १७ मृतदेहांवर गॅस दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती स्मशानभूमीचे प्रबंधक एकनाथ इंगळे यांनी दिली. त्यामुळे कोरोनाने नेमके किती रुग्ण दगावले, ही बाब संभ्रम निर्माण करणारी ठरली आहे. सरणावर कोरोनाग्रस्त नसलेल्या ११ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

 २४ तासांत १० कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. यामध्ये मोतीनगर (अमरावती) येथील ३५ व अचलपूर येथील ५५ वर्षीय महिला तसेच निंभोरा येथील ६५, राधानगरातील ६५, गुरुदेवनगर (मोझरी) येथील ६०, मोर्शी येथील ७३, मोझरी येथील ७५, महेश भवन कोविड सेंटर येथे ८०, नेरपिंगळाई येथे ७५, नांदगाव खंडेश्वर येथील ६८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

 

Web Title: Corona kills 10, 699 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.