शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा कहर; एकूण संख्या १७५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 16:21 IST

अमरावतीमध्ये सोमवारी दुपारपर्यंत आणखी ११ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली असून त्यात तीन महिन्याच्या मुलासह तीन वर्षांच्या मुलीचा यात समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावतीमध्ये सोमवारी दुपारपर्यंत आणखी ११ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली असून त्यात तीन महिन्याच्या मुलासह तीन वर्षांच्या मुलीचा यात समावेश आहे. दोन डॉक्टरांसह पोलीसपत्नीचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात कोरोनाची दहशत वाढत आहे.रविवारी शहराला कोरोनाने मोठा हादरा दिला होता. येथील हबीबनगर कंटेनमेंटमधील ३१ वर्षीय व्यक्ती २१ मे रोजी कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना क्वारंटाइन करून थ्रोट स्वॅब तपासणीला पाठविला होता. त्याचा अहवाल रविवारी सकाळी पॉझिटिव्ह प्राप्त झाला. यामध्ये पाच वर्षीय चिमुकली, ३० व ६५ वर्षीय महिला व ३३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. या व्यतिरिक्त या परिवाराच्या संपकार्तील २२ व ५४ वर्षीय पुरुष व ३६ वर्षांच्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. याव्यतिरिक्त २१ मे रोजी पॉझिटिव्ह अलहिलाल कॉलनीतील एका व्यक्तीच्या संपकार्तील ११ वर्षीय मुलगी तसेच शिवनगरात २१ व २२ मे रोजी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींच्या संपकार्तील शिवनगरातील ३० वर्षीय युवक व ६५ वर्षीय वृद्धाचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला. या सर्वांना कोविड रुग्णालयातील दुसऱ्या माळ्यावरील कक्षात हलविले आहे.कोविड रुग्णालयातील ४५ वर्षीय परिचारिकेचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोविड रुग्णालयात १० दिवसांची सेवा आटोपल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात येते. या महिलेचा थ्रोट स्वॅब तपासणीला पाठविला होता. याचा अहवाल रविवारी सकाळी प्राप्त झाल्याने कोविड रुग्णालयातील चौथा वॉरिअर संक्रमित झाला आहे.आरोग्य विभागाद्वारे या संक्रमित रुग्णांची हिस्ट्री घेण्याचे काम सुरू आहे. बाधिताच्या घराकडील मार्ग बंद करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या भागात सॅनिटायझरची फवारणी करण्यात येणार आहे. हबीबनगर परिसर यापूर्वीच कंटेनमेट जाहीर केला असल्याने आशा व एएनएम व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पथकाद्वारे गृहभेटी देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस