अमरावती : जून २०२१ अखेर पाच सिंचन प्रकल्पांच्या घळभरणीचे नियोजन जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले होते. मात्र, यंदा कोरोनामुळे पाच प्रकल्पांच्या घळभरणी वर्षभराकरीता लांबणीवर गेल्या असून जून २०२२ मध्ये या प्रकल्पांच्या घळभरणी पूर्ण होऊन प्रकल्पांत पाणीसाठा साचेल.
जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी तसेच त्यातून सिंचन निर्मिती व्हावी याकरीता काही मध्यम तर काही लघु प्रकल्प करण्यात येत आहेत. यामध्ये चांदूररेल्वे तालुक्यातील रायगड लघु प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून यंदा घळभरणी होऊ शकली नाही. तसेच चिखलदरा तालुक्यातील बागलिंगा लघु प्रकल्पाची घळभरणी लांबणीवर पडली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तसेच धारणी तालुक्यातील गर्गा ( गडगा) मध्यम तर वरुड तालुक्यातील पंढरी या मध्यम प्रकल्पाच्या घळभरणीचे नियोजन होते. मात्र, यंदा ते कोरोनामुळे जून अखेर होऊ शकले नाही. मात्र, यंदा दर्यापूर तालुक्यातील वाघाडी बॅरेज, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील निम्न- साखळी लघु प्रकल्प या प्रकल्पाची घळभरणी पूर्ण झाली असून त्यात पाणीसाठा साचत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना सिंचनाचा फायदा होणार आहे.
अ. क्र प्रकल्प सिंचन क्षमता (हेक्टर )
१) वाघाडी बॅरेज १६६०
२) बागलिंगा (लघु) १६९८
३) रायगड (लघू) २१९८
४) गर्गा (मध्यम ) ५९९३
५) पंढरी (मध्यम) ९८०४
६ निम्न साखळी-
कोट