शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

कोरोना : गावच्या सीमेवर बकेट अन् सॅनिटायझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 5:00 AM

सीमेवर तैनात स्वयंसेवक, युवक ती माहिती वॉकी-टॉकी (वायरलेस फोन) वरून गावातील कार्यालयाला देतात. वॉकी-टॉकीवर मिळालेली माहिती कार्यालयातील युवक संबंधितांपर्यंत पोहचवितात. मिळालेल्या माहितीवरुन गावकरी गावच्या सीमेवर पोहचतो. तेथे सामाजिक अंतर ठेवत त्या परिचिताशी गावकरी संवाद साधतो. संवादानंतर त्यांना परत पाठविले जाते. त्याला गावात प्रवेश दिला जात नाही.

ठळक मुद्देवॉकी-टॉकीवरून गावकऱ्यांना दिली जाते माहिती, आतिथ्याच्या अंगाने महामारी रोखण्याचे कार्य

अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता अचलपूर तालुक्यातील पायविहीर गावच्या सीमेवर गावकऱ्यांनी पाण्याने भरलेली बकेट, पाणी घेण्याकरिता जार आणि साबण व सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे.गावाच्या चारही सीमा मजबूत दोराने सील केल्या आहेत. बाहेरच्या कुणालाही गावात येण्यास परवानगी नाही. कुणी बाहेरचा इसम, पाहुणा किंवा परिचित आल्यास त्याला गावात प्रवेश दिला जात नाही. गावच्या सीमेवरच थांबवून त्याची विचारपूस केली जाते. त्याची माहिती घेतली जाते. सीमेवर तैनात स्वयंसेवक, युवक ती माहिती वॉकी-टॉकी (वायरलेस फोन) वरून गावातील कार्यालयाला देतात. वॉकी-टॉकीवर मिळालेली माहिती कार्यालयातील युवक संबंधितांपर्यंत पोहचवितात. मिळालेल्या माहितीवरुन गावकरी गावच्या सीमेवर पोहचतो. तेथे सामाजिक अंतर ठेवत त्या परिचिताशी गावकरी संवाद साधतो. संवादानंतर त्यांना परत पाठविले जाते. त्याला गावात प्रवेश दिला जात नाही. गावचे मुखीया शिवराम दहीकर यांचे नेतृत्वात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने पाळावयाचे नियम आणि घ्यावयाची दक्षता यावर ग्रामसभेने एकमताने निर्णय घेतले आहेत. गावकºयांनी यादरम्यान दारूची वाहतूक करणाºयाला मुद्देमालासह पोलिसांच्या स्वाधीनही केले. ग्रामस्थ जंगलात, शेतात जाताना सामाजिक अंतरासह स्वच्छतेच्या आरोग्यविषयक सर्व नियमांचे पालन करीत आहेत.सहा वॉकी-टॉकीलॉकडाऊनमध्ये गावात एकूण सहा वॉकी-टॉकीच्या मदतीने कोरोनाच्या स्थितीवर नियंत्रण ठेवले जात आहे. जंगलकामाच्या अनुषंगाने असलेल्या या वॉकी-टॉकीचा वापर गावाच्या हिताकरिता मोठ्या कल्पकतेने गावकरी करून घेत आहेत. गावातून निघणाºया व सील केलेल्या त्या चारही मार्गावर वॉकीटॉकी घेऊन स्वयंसेवक तैनात आहेत. यात प्रसन्न बिसंदरे, सुशाल धांडेकर, दिलीप जामुनकर, मोहन मोरले या वॉकीटॉकीसह सेवा देत आहेत.कोरोना अपडेट्सपायविहीर गावची लोकसंख्या ६३२ असून ११६ घर (कुटुंब) त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. वास्तव्यास असलेले ग्रामस्थ आदिवासी असून त्यांची बोलीभाषा कोरकू आहे. सामूहिक वनहक्क कायद्यांतर्गत त्यांना १९२ हेक्टर जंगल क्षेत्र मिळाले असून, या जंगलाचे संरक्षण आणि संवर्धन त्यांनी केली आहे. तिन्ही लॉकडाऊनमध्ये कुणीही गावाबाहेर पडलेले नाही. स्वत:ला लॉकडाऊन करून घेतले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या