शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

दर पाच मिनिटांनी एकाला कोरोनाचा डंख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 05:00 IST

जिल्ह्यात जानेवारी महिन्यांपासून आतापर्यंत २५,२७० कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे. या ७९ दिवसांत दरदिवशी ३१९.८७ पॉझिटिव्ह निष्पन्न झाले. म्हणजेेच दरदिवशी ४ मिनिटे ५० सेकंदात एका कोरोनाग्रस्ताची नोंद जिल्ह्यात झालेली आहे. याशिवाय याच कालावधीत २२७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. या कालावधीत दर ८ तास ३३ मिनिटांत एका पॉझिटिव्हचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ठळक मुद्दे१ जानेवारीपासून दर ८ तास ३३ मिनिटाला एका पॉझिटिव्हचा बळी

गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात जानेवारीपासून सुरू झालेल्या कोरोना उद्रेकात दर ४ मिनिटे ५० सेकंदात एका कोरोनाग्रस्ताची नोंद झाली आहे. याशिवाय दर ८ तास ३३ मिनिटांत एका कोरोनाग्रस्तांचा बळी गेल्याची आकडेवारी धक्कादायक आहे. या उद्रेकात ४० टक्क्यांवर गेलेली चाचण्यांमधील पॉझिटिव्हिटी आता आठ टक्क्यांवर आल्याचा दिलासादेखील आहे.जिल्ह्यात जानेवारी महिन्यांपासून आतापर्यंत २५,२७० कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे. या ७९ दिवसांत दरदिवशी ३१९.८७ पॉझिटिव्ह निष्पन्न झाले. म्हणजेेच दरदिवशी ४ मिनिटे ५० सेकंदात एका कोरोनाग्रस्ताची नोंद जिल्ह्यात झालेली आहे. याशिवाय याच कालावधीत २२७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. या कालावधीत दर ८ तास ३३ मिनिटांत एका पॉझिटिव्हचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.जिल्ह्यात पहिल्या कोरोनाग्रस्तांची नोंद ४ एप्रिलला झाली. तेव्हापासून आतापर्यंत म्हणजेच ३५० दिवसांत ४४,९३८ नागरिकांना कोरोनाचा डंख झालेला आहे. म्हणजेच एका दिवसांत १२८.३९ कोरोनाग्रस्तांची नोंद या काळात झाली. दर ११.१८ मिनिटांनी एका व्यक्तीला कोरोना संसर्ग झाला आहे व याच कालावधीत ६२४ व्यक्तींचा मृत्यू झाल्याने दरदिवशी तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दर ८ तास ३३ सेकंदात एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे.जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हा व महापालिका प्रशासनाद्वारे कोरोना नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.प्रत्येक तालुक्यात कोरोना सेंटरसोबत स्वॅब नमुने घेण्यासाठी केंद्रेदेखील सुरू करण्यात आली आहेत. याशिवाय पथकांद्वारा सातत्याने दंडात्मक कारवायादेखील सुरू आहे. याचाच परिपाक म्हणून या चार दिवसांत कोरोना संसर्गाला ओहोटी लागल्याचे दिसून येत आहे. तीनशे ते चारशेच्या घरात पॉझिटिव्ह येत आहे. पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासाजनक बाब आहे.

दर ५.४२ मिनिटाला एका कोरोनाग्रस्ताला डिस्चार्जजिल्ह्यात १९ मार्चपर्यंत ३९,५७३ कोरोनाग्रस्तांना संक्रमणमुक्त करण्यात आलेले आहे. हा रिकव्हरी रेट ८८.६८ टक्के आहे. जानेवारी महिन्यापासून १९ मार्चपर्यंत २०,९५७ व्यक्ती संक्रमणमुक्त झालेले आहेत. म्हणजेच दिवसाला २६५,२७ नागरिक कोरोनामुक्त झालेले आहे. दर ५.७१ मिनिटाला एक नागरिक कोरोनामुक्त होत असल्यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.

दिवसाला सरासरी १२८ पॉझिटिव्हजिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याचे ४ एप्रिलपासून आतापर्यंत ४४,९३८ रुग्णांची नोंद झालेली आहे. म्हणजेच एका दिवसात १२८ व ११ मिनिटे २४ सेकदांला एका कोरोनाग्रस्ताची नोंद झाली आहे. याशिवाय याच कालावधीत ६२४ कोरोनाग्रस्ताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. म्हणजेच दरदिवशी दोन व दर १२ तासांत एका कोरोनाग्रस्ताचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे धक्कादायक चित्र आहे.

नव्या स्ट्रेनविषयी चर्चा, दुजोरा नाहीकोरोनाच्या जनुकीय रचनेत बदल झालेला असून, जिल्ह्यात कोरोनाचा नवा ‘स्ट्रेन’ आला व याद्वारे संक्रमणात वाढ झाल्याचे आयएमएचे पदाधिकारी सांगत आहेत. याविषयी जिल्हा व आरोग्य प्रशासन बोलावयास तयार नाही. जिल्ह्यातून चार प्रकारांतील १०० नमुने जिनोम स्टडीकरिता पुणे एनआयव्हीला पाठविण्यात आले होते. याविषयी आयसीएमआरचा अहवाल अप्राप्त असल्याने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या